Home खेळ आदिश तनपुरे याने सिल्वासा येथे झालेल्या ऑल इंडिया ओपन चॅम्पियनशिप स्पर्धेत डेड...

आदिश तनपुरे याने सिल्वासा येथे झालेल्या ऑल इंडिया ओपन चॅम्पियनशिप स्पर्धेत डेड लिफ्टमध्ये पटकावले सुवर्ण पदक..

नगर : जागतिक पावर लिफ्टिंग फेडरेशन ( WRPF )च्या वतीने दादरा – नगर हवेली येथील सिल्वासा स्मार्ट सिटी येथे नुकत्याच पार पडलेल्या ऑल इंडिया ओपन चॅम्पियनशिप स्पर्धेत डेड लिफ्टमध्ये अहिल्यानगर येथील खेळाडू आदिश महेश तनपुरे याने सुवर्ण पदक मिळविले. त्याच्या या यशामुळे त्याचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होतं आहे.त्याच्या या यशामागे त्याचे कोच देवदत्त गुंडू यांचे मोलाचे सहकार्य आणि मार्गदर्शन आहे.

Oplus_131072

या स्पर्धेत आदिश तनपुरे याने 90 किलो वजन गटात सहभाग घेत डेडलिफ्ट प्रकारात आपले अत्यंत दर्जेदार प्रदर्शन करत कौशल्य सादर केले आणि त्याला सुवर्ण पदक मिळाले.
आदिशच्या या यशामुळे त्याला आता पुढे जाऊन नॅशनल स्पर्धेत अधिकृत भाग घेता येईल.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version