अहिल्यानगर दिनांक २२ जुलै
गोरगरीब सर्वसामान्य नागरिकांसाठी सरकार दरमहिन्याला रेशन दुकानाच्या मध्यातून धान्य पुरवठा करते मात्र हे धान्य गोरगरिबांच्या ताटातून काढून बाजारात विक्री करण्याचा काळाबाजार सध्या तेजीत आहे.

रेशन मालाचा काळाबाजार म्हणजे, सरकारने गरीब आणि गरजू लोकांसाठी स्वस्त दरात किंवा मोफत दिलेल्या धान्याचा गैरवापर करून, ते धान्य बाजारात जास्त किमतीला विकणे. यामुळे, ज्या लोकांना खरोखरच धान्याची गरज आहे, त्यांना ते मिळत नाही.
रेशन मालाचा काळाबाजार कसा होतो:
धान्य चोरी:स्वस्त धान्य दुकानांमध्ये (रेशन दुकाने) येणारे धान्य दुकानदार किंवा इतर लोक चोरून बाजारात विकतात.
खोट्या नोंदी:काही दुकानदार रेशन कार्डधारकांच्या नावावर जास्त धान्य घेतल्याच्या खोट्या नोंदी करून, ते धान्य बाजारात विकतात.
धान्याची साठेबाजी:काही व्यापारी स्वस्त दरात धान्य खरेदी करून, ते साठवून ठेवतात आणि नंतर जास्त किमतीला विकतात.
अशाप्रकारे काळाबाजार केला जात असून नगर शहरातील कांती चेंगे याचे मार्केट यार्ड परिसरात दुकानातून हा रेशन धान्याचा काळाबाजार या परिसरात करत असून “कर” चे एक गोडाऊन केडगाव इंडस्ट्रियल परिसरात तर दुसरे करपे मळ्यात असून या ठिकाणी असलेल्या गोडाऊनमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात माल असल्याची चर्चा समोर येत आहे. भिंगाचा “रबा” खोटे बायोमेट्रिक करून देण्यात पटाईत असून या त्रिकुटाच्या माध्यमातून सध्या मोठ्या प्रमाणात गव्हाचा माल आटा चक्की मध्ये जात आहे नगर पुणे महामार्गावरील एका आटा चक्की मध्ये हा माल दिला जातो.
पुरवठा विभागाने जागृतपणे केडगाव इंडस्ट्रियल एरिया मार्केट परिसर आणि करपे मळ्यातील गोडांवर जाऊन तपासणी केली तर अनेक धक्कादायक गोष्टी समोर येऊ शकतात त्यामुळे पुरवठा विभागाने बाबत गांभीर्याने घेऊन तपासणी करणे गरजेचे आहे. या तपासातून अनेक मोठे मासे आणि मोठी साखळी समोर येण्याची शक्यता आहे.
सरकार गोरगरिबांना अन्न देते देते मात्र मधले दलाल गोरगरिबाच्या अन्नातील घास ओरबाडून घेतात त्यामुळे अशा दलाला वेळीच आवरणे गरजेचे आहे.