Home राजकारण नगर एम आयडीसीत स्वतः महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घातलं लक्ष,...

नगर एम आयडीसीत स्वतः महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घातलं लक्ष, :-आमदार संग्रामभैय्या जगताप यांचा पुढाकार.

मुंबई

अहमदनगर एम.आय.डी.सी .मध्ये औद्योगीकरण व उद्योजकांचे अनेक वर्षापासून प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्यासाठी आमदार संग्रामभैय्या जगताप यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व उद्योग राज्यमंत्री आदितीताई तटकरे यांच्याकडे पाठपुरावा करून बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी विविध प्रश्नावर चर्चा करण्यात आली. नगर एम.आय.डी.सी. चा विस्तारीकरणाचा प्रश्न याच बरोबर एम.आय.डी.सी.तील १६८ प्लॉट धारकांचा प्रश्नासंदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी बैठकीत सांगितले की नगर एम.आय.डी.सी .च्या विकासासाठी नेहमीच सहकार्य राहील. एम.आय.डी.सी. च्या विस्तारीकरणासाठी पुढाकार घेऊ तसेच १६८ प्लॉट धारकांचा प्रश्न न्यायालयात प्रलंबित असून न्यायप्रक्रिया चा आदर करीत कायद्याने मार्ग काढून उद्योजकांना न्याय देऊ याच बरोबर आमदार संग्राम जगताप यांनी एम.आय.डी.सी. संदर्भात सुचवलेले प्रश्न मार्गी लावू !
आमदार संग्रामभैय्या जगताप म्हणाले की नगर एम.आय.डी.सी. चा विकास करण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व उद्योग राज्य मंत्री आदितीताई तटकरे यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. अहमदनगर एम.आय.डी.सी. मध्ये मोठे उद्योग आल्यानंतर अनेक युवकांना रोजगार मिळणार आहे. या कामासाठी नेहमीच प्रयत्नशील राहील असे ते म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली नगर एम. आय .डी .सी. संदर्भात बैठक संपन्न झाली. यावेळी उद्योग राज्यमंत्री आदितीताई तटकरे, आमदार संग्रामभैय्या जगताप, उद्योजक सागर निंबाळकर, सचिन काकड, सुनील कानवडे, सुमित लोढा, सचिन फाटक, औद्योगिक कार्यकारी अधिकारी डॉ.पी.अन्बलगन आदी उपस्थित होते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version