अहमदनगर दि.२२ नोव्हेंबर – आपला देश हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो शेतकरी दिवसभर शेतात आपले कष्ट करून विविध शेती उत्पादने घेत असतात शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या विक्रीसाठी योग्य बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीने कांदा उत्पादीत शेतकऱ्यांसाठी नेप्ती उपबाजार समिती निर्माण केली आज राज्यात या बाजार समितीचा नवलौकिक निर्माण झाला आहे या ठिकाणी नगर जिल्ह्यासह राज्यभरातून शेतकरी कांदा विक्रीसाठी येत असतात शेतकऱ्यांना या ठिकाणी चांगल्या सुविधा उपलब्ध होण्यासाठी बाजार समितीने व व्यापाऱ्यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे आज पंचगंगा बियाणे यांनी सामाजिक उपक्रमातून नेप्ती उपबाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून आपले सामाजिक कर्तव्य पार पाडले आहे. व्यवसाय करीत असताना प्रत्येकाने शेतकरी हिताचे उपक्रम राबविणे ही काळाची गरज बनली आहे शेतकऱ्यांना नेहमीच मदतीचा हात देणे हे आपले कर्तव्य आहे शेतकऱ्यांचे आरोग्य निरोगी व सदृढ राहण्यासाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची गरज असते.
असे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले.
असे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले.

नेप्ती उपबाजार समिती येथे शेतकऱ्यांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून दिली याचा शुभारंभ आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी बाजार समितीचे प्रशासन अधिकारी किशन रत्नाळे, पंचगंगा बियाणे चे संचालक प्रभाकर शिंदे, नंदकिशोर शिकरे,विजयकुमार बोरुडे, संतोष सूर्यवंशी,भास्कर मांडूळे, सुनील मिस्किन, अमित बजाज, अविनाश दळवी, अशोक लाटे, गोविंद सांगळे,नितीन ताठे, कैलास शिंदे, नामदेव डाके,संजय आवारे, हर्षल बोरा, अभिजीत बोरुडे,विकी वाघ, जयसिंग भोर, गणेश बोरुडे आदी उपस्थित होते.
पंचगंगा बियाणे चे संचालक प्रभाकर शिंदे म्हणाले की,आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून नेप्ती उप बाजार समिती येथे पंचगंगा बियाणे कंपनीच्या वतीने शेतकरी व व्यापाऱ्यांसाठी शुद्ध पाण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे यासाठी बाजार समितीचेही सहकार्य लाभले आहे शेतकरी मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीसाठी येत असतात त्यांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध व्हावी यासाठी कंपनीने पुढाकार घेतला आहे आरो मशीन व पिण्याच्या पाण्याची टाकी बसवली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे असे ते म्हणाले.