Home Uncategorized मालेगाव येथे रझा अकादमीच्या कार्यालयावर पोलिसांचा छापा दोन तास चौकशी सुरू

मालेगाव येथे रझा अकादमीच्या कार्यालयावर पोलिसांचा छापा दोन तास चौकशी सुरू

मालेगाव प्रतिनिधी

त्रिपुरा येथे हिंसाचार झाल्या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी मालेगाव येथील काही मुस्लीम संघटनांनी निषेध मोर्चा काढला होता यादरम्यान दगडफेकीचे ही घटना घडली होती त्याचप्रमाणे अमरावती आणि नांदेड मध्ये सुद्धा मोर्चा दरम्यान दगडफेकीच्या घटना घडून मोठा हिंसाचार घडल्याने अमरावतीमध्ये गेल्या चार दिवसांपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी रझा अकादमी या संघटनेच्या कार्यालयावर छापे टाकून काही कार्यकर्त्यांची चौकशी केली सुमारे दोन तास चौकशी सुरू होती छापे आणि चौकशीदरम्यान काही पत्रक आणि काही दस्तावेज पोलिसांच्या हाती लागले याची माहिती समोर येत आहे

मालेगाव अमरावती नांदेड या ठिकाणी हिंसाचाराबाबत रझा अकादमी चे नाव कुठेही पुढे आले नसल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले आहे तर त्रिपुरामध्ये कोणतीही हिंसाचाराची घटना घडली नसून चुकीची पोस्ट व्हायरल झाल्याचा केंद्राने स्पष्टीकरण दिले आहे त्यामुळे महाराष्ट्र मध्ये हा हिंसाचार कोणी घडवून आणला याबाबत याचा पोलिस तपास करत आहेत

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version