HomeUncategorizedलोणी येथील निवृत्त लष्करी जवानाच्या खुन प्रकरणातील दोन आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडुन...

लोणी येथील निवृत्त लष्करी जवानाच्या खुन प्रकरणातील दोन आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडुन जेरबंद

advertisement

अहमदनगर दि.३१ जुलै
अहमदनगर जिल्ह्यातील लोणी पोलीस स्टेशनच्या हद्दीत 30 जुलै रोजी एका अज्ञात इसमाचा मृतदेह सापडला होता या घटनेनंतर लोणी पोलिसांनी अहमदनगर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यामध्ये या अनोळखी इसमा विषयी माहिती कळवल्यानंतर तो तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये त्या वर्णनाचा एक इसम हरवला असल्याची तक्रार त्याच्या पत्नीने दिली होती.

याप्रकरणी मयताची ओळख पटल्यानंतर हा प्रकार खून असल्याचं पोलीस तपासात आढळून आले त्याप्रमाणे पोलिसांनी लोणी पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा तोफखाना पोलीस स्टेशन यांनी समांतर तपास करत असताना हा इसम अहमदनगर शहरातील विठ्ठल जगन्नाथ भोर असून त्याचे आणि नगर शहरातील मनोज मोतीयानी यांचे जमिनी बाबत वाद सुरू असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला असता मनोज मोतीयानी याचे मोबाईल बंद होते आणि तो फरार असल्याचं लक्षात येतात पोलिसांनी मनोज मोतियानीचा तपास सुरू केला.

जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी पोसई/सोपान गोरे, पोहेकॉ/मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, संदीप पवार,देवेंद्र शेलार, पोना/रविंद्र कर्डीले, विजय ठोंबरे, विशाल गवांदे, फुरकान शेख, पोकॉ/रणजीत जाधव, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड यांचे एक पथक स्थापन करून आरोपीच्या शोधासाठी रवाना केले होते या प्रकरणातील आरोपी मनोज मोतीयानी आणि त्याचा एक साथीदार हा मध्य प्रदेश मधील भोपाळकडे जात असल्याचे पोलिसांना माहिती कळताच पोलिसांनी भोपाळ येथे धाव घेतली

मध्यप्रदेश मधील सेंधवा येथे जावुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मनोज वासुमल मोतीयानी, वय 33, रा. सावेडीगांव, अहमदनगर व 2) स्वामी प्रकाश गोसावी वय 28, रा. सावेडीगांव, या दोघांना ताब्यात घेतले.

मयत विठ्ठल भोर याचे व मनोज मोतीयानी यांचे प्रॉपर्टी खरेदी विक्रीचा व्यवहार होता त्यावरुन दिनांक 29 जुलै रोजी मोतीयानी याची पांढरी रंगाची हुंडाई आय-20 कार मधुन जाताना निंबळक येथे मनोज मोतीयानी व मयत भोर यांच्यात वाद झाल्याने मनोज मोतीयानी याने साथीदार स्वामी गोसावी याच्या मदतीने भोर यांच्या छातीवर स्क्रुड्रायव्हरने वार करुन त्याचा खुन केला व भोर यांचे प्रेत लोणी परिसरातील पेट्रोलपंपा जवळ फेकुन दिले अशी माहिती आरोपींनी पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन लोणी पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे.

आरोपी मनोज वासुमल मोतीयानी हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द अहमदनगर जिल्ह्यात विनयभंग, अल्पवयीन मुलीस पळुन नेणे, खंडणीच्या उद्देशाने जिवे मारण्याची धमकी देणे, दुखापत करणे व जिवे मारण्याची धमकी देणे असे गंभीर स्वरुपाचे एकुण -6 गुन्हे दाखल आहेत

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular