Home क्राईम अर्बन बँक सोने तारण घोटाळा प्रकरण सोन्याचे मूल्यांकन करणारा ‘तो’ पोलिसांच्या ताब्यात...

अर्बन बँक सोने तारण घोटाळा प्रकरण सोन्याचे मूल्यांकन करणारा ‘तो’ पोलिसांच्या ताब्यात आता खरे आरोपी समोर येण्यास होणार मदत

अहमदनगर- दि.११ फेब्रुवारी
नगर अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेत सन २०१७ ते २०२१ या कालावधीत गोल्ड व्हॅल्युअर व कर्जदार यांनी संगनमत करून बनावट दागिने गहाण ठेवून बँकेकडून तब्बल पाच कोटी ३० लाख १३ हजार रुपयांचे कर्ज घेतले होते या प्रकरणी त्यामध्ये १५९ कर्जदारांचा समावेश आहे या प्रकरणात शेवगांव शाखेतील मुख्य आरोपी विशाल दहिवाळकर यास शुक्रवारी दुपारी अटक करण्यात आली असून आता या प्रकरणातील मुख्य आरोपी समोर येण्यास मदत होणार आहे

सोने तारण ठेवून नगर अर्बन बँकेकडून घेण्यात आलेल्या कर्जाची संबंधितांनी परतफेड केली नाही. त्यामुळे बँकने या सोन्याचा रितसर लिलाव ठेवला. लिलावापूर्वी तपासणीला सुरुवात होताच, पहिल्या पाच पिशव्यांत सोन्याऐवजी बेन्टेक्सचे दागिने असल्याचे आढळून आले होते तेव्हा हा घोटाळा उघडकीस आला होता

अर्बन बँकेचे सेवा निवृत्त शाखाधिकारी गोरक्षनाथ शिंदे यांनी  आत्महत्या केली होती आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठीत ‘नगर अर्बन बँकेत सोन्याचे मूल्यांकन करणारे प्रतिनिधी (गोल्ड व्हॅल्युअर) व खातेदारांनी केलेल्या चुकांमुळे मला त्रास सहन करावा लागत आहे. सोने तारण ठेवताना खातेदार आणि व्ह्यॅल्युअर यांचा संबंध असतो. त्यात माझा काहीच संबंध नाही’. अशा स्वरूपाचा उल्लेख होता त्यामुळे आता सोन्याच्या मूल्यांकन करणारा प्रतिनिधी पोलिसांच्या ताब्यात आल्यामुळे या प्रकरणातील खरे आरोपी समोर येतील.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version