Home राजकारण अहमदनगर जिल्ह्यातील नऊ नगरपरिषदेच्या निवडणुकीचा धुरळा दोन मार्चपासून उडणार

अहमदनगर जिल्ह्यातील नऊ नगरपरिषदेच्या निवडणुकीचा धुरळा दोन मार्चपासून उडणार

अहमदनगर दि. २२ फेब्रुवारी
कोपरगाव,संगमनेर,श्रीरामपूर,जामखेड,शेवगाव,पाथर्डी,
राहाता,राहुरी,देवळाली प्रवरा या नगर परिषदेच्या  निवडणुकीचा बिगुल वाजला असून दोन मार्चपासून सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम सुरु होणार आहे

.त्यामुळे आता या तालुक्यांमध्ये चांगलाच राजकीय कलगीतुरा पाहायला मिळणार आहे कोपरगाव संगमनेर श्रीरामपूर जामखेड शेवगाव पाथर्डी राहता राहुरी आणि देवळाली प्रवरा या सर्वच तालुक्यांमध्ये सध्या चांगलीच राजकीय घमासान सुरू आहे.

कोपरगाव मध्ये काळे आणि कोल्हे यांच्या वर्चस्वाची लढाई संगमनेरमध्ये थोरात पुन्हा गड राखाााणारर का याबाबत उत्सुकता श्रीरामपूरमध्ये ससाने अनुराधा अदिक आणि भानुदास मुरकुटे यांच्या मध्ये रंगणार सामना जामखेड मध्ये पुन्हा एकदा राम शिंदे आणि रोहित पवार यांचा सामना होऊ शकतो शेवगाव मध्ये घुले बाजी मारणार का राजळे याकडे सर्वांचे लक्ष असून पाथर्डी मध्ये प्रताप ढाकणे विरुद्ध राजळे असा सामना रंगेेेल राहता मध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांचा जलवा चालणार का तर राहुरी मध्ये प्राजक्त तनपुरे यांची कसोटी लागणार आहे त्यामुळे या 9 तालुक्यांमध्ये चांगलाच राजकीय धुरळा उडणार असून आता हौसे नवसे सर्व कार्यकर्ते कामाला लागतील.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version