Home क्राईम अहमदनगर जिल्ह्यातील २८ वर्षापासुन प्रलंबित असलेला एकुण ९९७ किलो अफू गांजा नष्ट...

अहमदनगर जिल्ह्यातील २८ वर्षापासुन प्रलंबित असलेला एकुण ९९७ किलो अफू गांजा नष्ट करण्यात आला अहमदनगर जिल्हा पोलीस दलाची कारवाई

अहमदनगर दि २५ फेब्रुवारी

अहमदनगर जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी कारवाया करत पोलिसांनी १९९४ ते २०१४ पावेतो ३२ गुन्ह्यात एकुण ९९७ किलो २७४ ग्रॅम गांजा/अफु जप्त करण्यात आला होता. या सर्व गुन्ह्यांचा मुदतीत तपास पुर्ण करुन
न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. न्यायालयात नियमित सुनावणी होवुन न्यायालयीन
प्रक्रियापुर्ण करुन न्यायालयाने मुद्देमाल नाश करणे बाबत आदेश दिले होते.नाश करण्याची योग्य ती कायदेशिर प्रक्रिया पुर्ण करुन शनिवारी राजंणगांव एमआयडीसी येथील कंपनीत नाश करण्यात आला
पोलीस महासंचालक यांच्या आदेशान्वये पोलीस अधिक्षक
मनोज पाटील यांच्या अध्यक्षते खाली ,(सदस्य) तथा
अपर पोलीस अधिक्षक सौरभ कुमार अग्रवाल,पोलीस उपअधिक्षक (गृह) मेघश्याम डांगे (सदस्य). पोलीस निरीक्षक,अनिल कटके (सदस्य)
गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार सफौ/विष्णु घोडेचोर, पोहेकॉ/भाऊसाहेब कुरुंद, पोहेकॉ/सखाराम मोटे,
पोहेकॉ/शरद बुधवंत, पोहेकॉ/देवेंद्र शेलार, पोना/शंकर चौधरी, पोकॉ/जयराम जंगले, चापोहेकॉ/अर्जुन बडे व
चापोहेकॉ/बबन बेरड अशांनी गांजा/अफु नाश करण्याची योग्य ती कायदेशिर प्रक्रिया पुर्ण करून कारवाई केली आहे

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version