Home क्राईम अहमदनगर जिल्ह्यात बोकडासह एकाच दिवशी चार मोटारसायकल दोन चारचाकी वाहने आणि तीन...

अहमदनगर जिल्ह्यात बोकडासह एकाच दिवशी चार मोटारसायकल दोन चारचाकी वाहने आणि तीन पाण्याच्या मोटारी आणि दोन महागड्या मोबाईलच्या चोऱ्यांची नोंद

अहमदनगर दि. 22 फेब्रुवारी
अहमदनगर जिल्ह्यात सध्या मोटारसायकल आणि चार चाकी चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून सोमवारी एका दिवसात अहमदनगर जिल्ह्यात एकाच दिवशी ४ मोटर सायकल दोन चार चाकी वाहने तर तीन इलेक्ट्रिक पाणबुड्या आणि दोन मोबाईल चोरी तर बोकड आणि शेळी चोरी झाल्याचा प्रकारही घडला आहे. सर्वच प्रकारच्या चोर्‍या अहमदनगर जिल्ह्यात 21 फेब्रुवारी रोजी झालेल्या आहेत.

राहाता तालुक्यातील तीस हजार रुपये किमतीची बजाज पल्सर, भिंगार पोलीस स्टेशनच्या हद्दीत पंधरा हजाराची हिरो होंडा स्प्लेंडर कोपरगाव हद्दीत हिरो होंडा स्प्लेंडर, घारगाव आदित बजाज सिटी तर तोफखाना पोलीस ठाण्यात एक मारुती कार आणि संगमनेर तालुक्यातून एक ट्रक ची चोरी झाल्याची घटना घडली असून पाथर्डी संगमनेर आणि राहता मध्ये इलेक्ट्रिक पाणबुड्या मोटारींची चोरी झाली आहे कर्जत आणि राजूर येथे मोबाईल चोरीची तक्रार दाखल करण्यात आली असून शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात बोकड आणि शेळी ची चोरी झाल्याची तक्रार दाखल करण्यात आलेली आहे.

अहमदनगर जिल्ह्यात मोटरसायकल चोऱ्यांसह चारचाकी वाहने, मोबाईल, विहिरीवर नदीत लावलेल्या पाणी उपसा करणाऱ्या मोटार चोरीचे प्रमाण जास्त वाढले असून पोलिसांना या चोऱ्या करणाऱ्या टोळ्यांचा पर्दाफाश करणं हे एक मोठं आव्हान आहे.

नागरिकांनी मोटरसायकल चारचाकी वाहन ज्या ठिकाणी उभी करत असतात त्या ठिकाणी योग्य खबरदारी घेणे गरजेचे आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version