अहमदनगर – दि १७ फेब्रुवारी
कोतवाली पोलिसांनी बुधवारी नगर शहरातील मार्केटयार्ड परिसरात दुचाकीवरून विक्रीस नेत असलेला गुटखा व सुगंधीत सुपारीजन्य पडर्थासह दोन जणांना पकडलं होत त्यांच्या कडून मिळालेल्या माहिती वरून तपास केला असता पोलिसांनी जप्त केलाय सुमारे एक कोटी सहा लाख सातशे वीस रुपयांचा गुटखाजन्य पदार्थ
विशेष म्हणजे तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीच्या आणि एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या सीमेवर गुटख्याचे गोडावून होते पोलिसांनी दुचाकीवर पकडलेल्या दोन्ही इसमांच्या माहितीनुसार एमआयडीसी मध्ये छापा टाकला असता त्या ठिकाणी सुमारे एक कोटी रुपयांचा गुटखा सापडला
महाराष्ट्र राज्यात गुटखा सुगंधीत सुपारी विक्री करणे व त्याचा साठा करुन सुगंधीत तंबाखुजन्य पदार्थ कब्जात बाळगण्यास प्रतिबंध असतांना एवढा मोठा साठा आला कुठून याचा तपास आता पोलिसांना करावा लागणार आहे.
राकेशकुमारा जगदंबप्रसाद मिश्रा (वय ४२ वर्ष रा MIDC अ.नगर),अभिजित गोवींद लाटे (वय ३४ वर्ष रा पाईपलाईन रोड)राहुल कैलासनाथ सिंग, अझर शकील शेख, चंद्रकेश शोभनाथ तिवारी, शिवप्रकाश रामकुमार तिवारी, मोहसिन शब्बीर पटेल, अर्जुन शंकर यादव, नितीन सुनिल साठे आणि शादाब शब्बीर पटेल यांच्यावर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून शेडचा मालक रावसाहेब शिवाजी भिंगारदिवे फरार झाला आहे
या प्रकरणाचा तपास कोतवाली पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक गजेंद्र इंगळे हे करीत आहेत. ही सर्वात मोठी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल,उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक संपतराव शिंदे, पोसई गजेंद्र इंगळे, व गुन्हे शोध पथकाचे पोना योगेश भिंगारदिवे, पोना गणेश धोत्रे, पोना नितीन शिंदे, पोना सलिम शेख, पोना संतोष गोमसाळे, पोना सागर पालवे, पोना राजु शेख, पोकाँ अभय कदम, पोकाँ दिपक रोहकले, पोकाँ अमोल गाढे, पोकाँ सोमनाथ राउत, पोकाँ अतुल काजळे तसेच पोहेकाँ दिपक साबळे, चापोहेकॉ सतिष भांड, पोना राहुल गवळी, पोकाँ संदीपथोरात, पोकाँ राहुल गुंडु यांनी केली आहे.
“अहमदनगर शहरात गुटखा पकडला जातो मात्र हा गुटखा कसा आणला जातो गुटका आणणारा तो मास्टर माईंड कोण आणि संपूर्ण जिल्ह्यात विक्री करणारा तो दलाल कोण याची माहिती आत्तापर्यंत पोलिसांना मिळालेली नाही मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणावर गुटका सापडल्याने आता पोलिसांनी त्याच्या मुळा पर्यंत जाणे महत्वाचे ठरणार आहे जर गुटक विक्री करण्याला कायमचा पायबंद घालायचा असेल तर पोलिसांना याची पाळेमुळे खोदून काढावे लागतील तेव्हाच हा गुटखा विक्री व्यवसाय समूळ नष्ट होऊ शकतो.”