Home क्राईम कामाला का गेली ? म्हणून विवाहितेला मारहाण करुन दिली ठार मारण्याची धमकी

कामाला का गेली ? म्हणून विवाहितेला मारहाण करुन दिली ठार मारण्याची धमकी

नेवासा दि.१४ फेब्रुवारी प्रतिनिधी :- आदित्य सुकाळकर

मोलमजूरीच्या कामाला का गेली ? असे म्हणून सासरा व नवऱ्याने विवाहितेला बेदम मारहाण करुन जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना बकुपिंपळगांव (ता. नेवासा) येथे घडली.

याबाबत अधिक सविस्तर वृत्त असे की,तालुक्यातील बकुपिंपळगांव येथे सिमरन अमिन शेख (वय १९) रा. बकुपिंपळगांव ही विवाहिता रोजंदारीवर उदनिर्वाहासाठी कामाला गेली असता तीचा नवरा अमिन करीम शेख याने गुरुवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास दारु पिवून येवून तु कामाला का गेली असे म्हणून या विवाहितेला लाथाबुक्याने मारहाण केली.सासऱ्याने भांडणे सोडविण्याऐवजी सुनेला शिवीगाळ करुन जिवे ठार मारण्याची धमकी देवून घरातून हकलून दिले याबाबत विवाहितेने नेवासा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन नेवासा पोलिस ठाण्यात पती व सासऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version