मुंबई दि.११ एप्रिल
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानावर झालेल्या हल्ला प्रकरणानंतर मुंबई पोलिसांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर अटकेची कारवाई केली होती. गुणरत्न सदावर्तेंना दोन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली होती. आता नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार गुणरत्न सदावर्तेंना 2 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. त्यामुळे सदावर्तेंचा जेलमधील मुक्काम वाढला आहे.
गुणवार्ते सदावर्ते यांना ताब्यात घेण्यासाठी सातारा पोलीसही मुंबईमध्ये दाखल झाले होते सातारा तालुक्यातील फलटण येथे त्यांच्यावर एक गुन्हा दाखल असून त्यामध्ये त्यांना अद्याप अटक झाली नसल्याने सातारा पोलिस आज मुंबईत दाखल झाले होते मात्र सदावर्ते यांना दोन दिवस पोलिस कोठडी सुनावली सदावर्ते यांना दोन दिवसानंतर सातारा पोलीस ताब्यात घेऊ शकतात.
तिकडे सोमय्या पिता-पुत्रांच्या जामीन अर्जावर सुनावणी झली असून किरीट सोमय्यांचा अर्ज फेटाळला तर निल सोमय्या यांच्या अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे त्या मुळे सोमय्या यांच्या पुढील अडचणी वाढल्या आहेत.