Home क्राईम टाकळीभान येथील अवैध गावठी हातभट्टी दारू अड्डे उद्ध्वस्त संदीप मिटके यांच्या पथकाची...

टाकळीभान येथील अवैध गावठी हातभट्टी दारू अड्डे उद्ध्वस्त संदीप मिटके यांच्या पथकाची कारवाई ८४०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त

श्रीरामपूर दि १४ फेब्रुवारी :

श्रीरामपुर तालुक्यातील टाकळीभान येथे गावठी हातभट्टी दारू अड्डे व हातभट्टी दारू तयार करणाऱ्या अड्ड्यावर छापा टाकून गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन, तयार गावठी हातभट्टी दारू नष्ट करण्यात आली या प्रकरणी बाळू शहादु मोरे रा टाकळीभान तालुका श्रीरामपूर,संगीता मच्छिंद्र डुकरे रा. माळेवाडी टाकळीभान तालुका श्रीरामपूर या दोन्ही आरोपींच्या हातभट्टीच्या हटन वर सुमारे८४००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस कॉन्स्टेबल नितीन शिरसाठ यांचे फिर्यादीवरून श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन येथे, मुंबई दारूबंदी कायदा कलम 65 ( फ) (क) (ड ) (ई) प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

अचानक झालेल्या या कारवाईमुळे टाकळीभान परिसरातील अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले असून सदर कारवाई चे टाकळीभान येथील महिलांनी पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके व त्यांचे पथकाचे कौतुक करून आभार व्यक्त केले.

पोलीस अधीक्षक मनोज पाटील,अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, एएसआय. राजेंद्र आरोळे, हेकॉं.सुरेश औटी,पोकॉ.नितीन शिरसाठ आदींनी ही कारवाई केली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version