Home राजकारण ढोल ताशांच्या गजरात सहकार पॅनलचे शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल,मतदार सहकार...

ढोल ताशांच्या गजरात सहकार पॅनलचे शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल,मतदार सहकार पॅनेलच्या पाठीशी असल्याने विजय निश्चित- बाबासाहेब मुदगल

अहमदनगर – सुथो –
अहमदनगर महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या महत्वाच्या असणाऱ्या अहमदनगर महानगरपालिका कर्मचारी सहकारी संस्थेची पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून सोमवारी शेवटच्या दिवशी सहकार पॅनलच्या उमेदवारांनी ढोल-ताशांच्या गजरात शक्तिप्रदर्शन करत आपले अर्ज दाखल केले आहेत. सहकार पॅनल आणि जनसेवा पॅनल अशी दुहेरी लढत या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे सहकार पॅनल ची धुरा बाबासाहेब मुदगल आणि जितेंद्र सारसर यांनी सांभाळली आहे या दोघांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनल सध्या जोरदार आघाडीवर असून सभासदांच्या विश्वासाच्या जोरावर आपल्या पॅनलचा विजय निश्चित असल्याचा बाबासाहेब मुदगल यांनी सांगितले आहे .१८ डिसेंबर रोजी या निवडणुकीसाठी मतदान होणार असून. त्याच दिवशी दुपारी निकाल जाहीर होणार असल्याने आता या निवडणुकीत प्रचाराच्या दरम्यान खरी रंगत येणार आहे.


सहकार पॅनेलचे उमेदवार पुढील प्रमाणे सर्वसाधरण गटातून बाबासाहेब मुदगल,जितेंद्र सारसर, बाळासाहेब पवार, अजय कांबळे,कैलास चावरे, सतीश ताठे, श्रीधर देशपांडे, विकास गीते, विजय कोतकर, बलराज गायकवाड, महिला राखीव गट प्रमिलाताई पवार ,उषाताई वैराळ, इतर मागास प्रवर्ग गट किशोर कानडे अनुसूचित जाती जमाती गट गुलाब गाडे तर इतर भटक्या विमुक्त जाती गटा मध्ये बाळासाहेब गंगेकर हे उमेदवारी करत आहेत

सहकार पॅनलच्या सर्व उमेदवारांना मतदान करून महानगरपालिका सहकारी पतसंस्थेचा निवडणुकीत विजयी करावे असे आवहान बाबासाहेब मुदगल आणि जितेंद्र सारसर यांनी केले आहे

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version