अहमदनगर दि.१०
तोफखाना पोलीस ठाण्याच्या आवारात शुक्रवारी सकाळी पोलीस कर्मचार्यांना एक घुबड जखमी अवस्थेत आढळून आले होते. तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय शिरसाठ,महादेव पवार या कर्मचाऱ्यांनी ही माहीती पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके यांना दिली. नंतर सदर पक्ष्या विषयी प्राणीमित्र मंदार साबळे यांना माहीती देण्यात आली मंदार साबळे यांनी तातडीने तोफखाना पोलीस ठाण्यात धाव घेऊन सदर पक्षास ताब्यात घेऊन उपचारासाठी वन विभागाकडे सुपूर्त केले आहे.सदर जखमी घुबड हे गव्हाणी घुबड असून नगर परिसरात सर्वत्र आढळते.