पुणे – दि. १० डिसेंबर
पुणे जिल्ह्यात जाऊन दरोडा टाकणाऱ्या नगरच्या टोळीला पुणे पोलिसांनी अवघ्या ७२ तासात अटक केली आहे पुणे जिल्ह्यात मागील आठवड्यात चौदा नंबर येथील अनंत पतसंस्थेवर भर दुपारी दरोडा पडला होता. त्यामध्ये पतसंस्थेचे व्यवस्थापक राजेंद्र भोर यांचा मृत्यू झाला होता तसेच अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील बेळवंडी फाटा येथे एका पातसंस्थेवर भर दिवस दरोडा टाकून गोळीबार करण्यात आला होता ही घटना नगर पुणे रोडवर घडली होती त्या मुळे या घटनेतील आरोपी एकाच असल्याचं पोलिसांना संशय होता या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच सोमवारी ७ डिसेंबर रोजी जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथे पिस्तुलाचा धाक दाखवून इलेक्ट्रॉनिक्स दुकानातील रोख रक्कम चोरून नेल्याची घटना घडली होती. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती त्यामुळे पुणे पोलिसांसमोर एक मोठं आव्हान निर्माण झाले होते एकापाठोपाठ एक गोळीबार करून बंदुकीचा धाक दाखवून चोऱ्या होत असल्याने पोलिसांवर टीका होत असतानाच पोलिसांनी या घटनेचा तपास अवघ्या ७२ तासात लावून अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सहा आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले आहे .
हृषीकेश बळवंत पंडीत (वय २२, रा. खरंडी, ता.नेवासा), अरबाज नवाब शेख (वय २०, रा. वडाळा व्हेरोबा, ता. नेवासा), वैभव रविंद्र गोरे (वय २१, रा. खरवंडी, ता. नेवासा), राहुल राम चव्हाण (वय २०, रा. खरवंडी, ता. नेवासा), शुभम बाळासाहेब शिंदे (वय २१, रा. खरवंडी ता. नेवासा) आणि प्रकाश विजय वाघमारे (वय २०, रा. माळी चिंचोरा ता. नेवासा) अशी आरोपींची नावे असून तपास करत असताना डीजे बँड पथकातील काही व्यवसायिक आणि कामगार या टोळी मध्ये असल्याचं पोलिसांना कळले त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून या आरोपींना अटक केली आहे या टोळीकडून आणखीन काही मोठे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील बेलवंडी फाटा येथील पतसंस्थेवर पडलेल्या दरोड्यात या टोळीचा काही सहभाग आहे का याबाबतही तपास होणार आहे.