Home जिल्हा धक्कादायक बीड जिल्ह्यातून नगर मध्ये येत होते १९ कोरोना बाधित ,आरोग्ययंत्रणेच्या...

धक्कादायक बीड जिल्ह्यातून नगर मध्ये येत होते १९ कोरोना बाधित ,आरोग्ययंत्रणेच्या सतर्कतेमुळे धोका टाळला

बीड – दि.१० डिसेंबर
कोरोना ची भीती संपत असतानाच पुन्हा एकदा काही गावांमधून मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण मिळू लागल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. असाच काहीसा प्रकार बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यात घडला आहे वडवणी येथून गुरुवारी २२ डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी काही रुग्ण निघाले असताना बीड जिल्ह्यातील एका आरोग्य केंद्रात या सगळ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. २२ पैकी १९ जण पॉझिटिव्ह आले. हे अहवाल आल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांना धक्काच बसला. एवढ्या मोठ्या प्रमाणावर एकदाच रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने त्यांनी ही माहिती तत्काळ तालुका स्तरावरील आरोग्य अधिकाऱ्यांना दिली. या सर्वांना रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. हे रुग्ण बीड जिल्ह्याच्या हद्दीतच आढळून आल्याने नगर जिल्ह्याचा धोका टाळला आणि त्यांना तिथून पुढे उपचारासाठी बीड जिल्ह्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.दोन दिवसांपूर्वी वडवणी शहरातील एका शाळेतील दोन विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले. त्यामुळे ही शाळा सोमवारपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

जिल्ह्यात गुरुवारी कोरोनाचे आणखी सहा रुग्ण आढळले. यात अंबाजोगाई, आष्टी, बीड, केजमधील रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यातील आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या १ लाख ३ हजार ५९० एवढी झाली आहे. त्यापैकी १ लाख ७०१ कोरोनामुक्त झाले असून २ हजार ८३३ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ५३ जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रौफ शेख यांनी दिली.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version