Home क्राईम तोफखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीत कोतवाली पोलिसांचं गुटका सर्जिकल स्ट्राइक तीन ट्रक गुटका...

तोफखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीत कोतवाली पोलिसांचं गुटका सर्जिकल स्ट्राइक तीन ट्रक गुटका पोलिसांनी केला हस्तगत

अहमदनगर दि१६ फेब्रुवारी
अहमदनगर शहरातील एमआयडीसी भागात छापा टाकून कोतवाली पोलिसांनी गोवा, सितारा गुटखा माणिकचंद गुटखा पकडला असून सुमारे तीन ट्रक गुटखा पोलिसांनी जप्त केला आहे.

कोतवाली पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार नगर शहरातील एमआयडीसी भागात मध्ये लाखो रुपयांचा गुटका लपून ठेवला असल्याची माहिती मिळाल्यानंतर कोतवाली पोलिसांनी एमआयडीसी भागातील तोफखाना पोलिस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या एका गोडावून वर छापा टाकून गुटखा जप्त केला आहे उशिरापर्यंत ही कारवाई सुरू असून गोडाऊन मधून ट्रक मध्ये गुटखा भरण्याचे काम सध्या सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे गेल्या अनेक दिवसांपासून शहरामध्ये गुटखा तस्करी होत होती मात्र मोठी कारवाई होत नसल्याने पोलिसांच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण होत होते मात्र कोतवाली पोलिसांनी मोठी कारवाई करत लाखो रुपयांचा गुटखा जप्त केला आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल शहर पोलीस उपाधीक्षक अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली  कोतवाली पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे, पोलीस निरीक्षक गजेंद्र इंगळे पोलीस नाईक योगेश भिंगारदिवे, पोलीस नाईक गणेश धोत्रे, पोलीस नाईक संतोष गोमसाळे ,पोलीस नाईक सलीम शेख, पोलीस नाईक नितीन शिंदे ,पोलीस नाईक सागर पालवे ,पोलीस नाईक राजू शेख ,पोलीस कॉन्स्टेबल दीपक रोहकले, पोलीस कॉन्स्टेबल अमोल गाडे ,पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ राऊत ,पोलीस कॉन्स्टेबल अतुल काजळे,I पोलीस कॉन्स्टेबल अभय कदम या पथकाने केली आहे

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version