अहमदनगर दि.१०
अहमदनगर शहराजवळील एमआयडीसी येथील सन फार्मा या कंपनीतील काही युनिटला बुधवारी रात्रीच्या सुमारास आग लागून एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता. मात्र तरीही गुरुवारी कंपनीमार्फत कोणताही गुन्हा अथवा तक्रार अर्ज पोलीस स्टेशनला देण्यात आला नव्हता.गुरुवारी या कंपनीतील घटनास्थळाला कामगार मंत्री बच्चू कडू यांनी भेट देऊन पाहणी केली तसेच या घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर ताबडतोब गुन्हे दाखल करा असे आदेश दिले होते. मात्र याबाबत अद्याप कुठलीही हालचाल झाली नसल्याचं समोर येत आहे.पुन्हा आता या प्रकरणी चौकशीचा फार्स चालू झाला असून एमआयडीसी पोलीस स्टेशन मध्ये फक्त कर्मचाऱ्याच्या मृत्यूप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. एमआयडीसी प्राधिकरणाचे अधिकारी स्वप्नील देशमुख यांना कामगार मंत्री बच्चू कडू यांनी तातडीने प्रथमदर्शनी जे दोषी दिसतात त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. मात्र स्वप्नील देशमुख यांनी चौकशी करूनच गुन्हा दाखल होईल असे सांगत कामगार मंत्री बच्चू कडू यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे असं दिसून येतं आहे नगरकरांना चौकशीचा फार्स आता चांगलाच माहित झाला आहे.कारण अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला आग लागून एक महिना उलटून गेला तरीही अजून चौकशी चालू आहे. या घटनेत १४ मृत्यू झाले होते त्यामुळे नागरकरांना आता ही चौकशी चांगलीच माहीत झाली आहे.