Home राजकारण नगरसेविका रुपालिताई वारे यांच्या निधीमधून मंजूर असलेल्या मुकुंदनगर मधील शांतीधाम मंदिराच्या...

नगरसेविका रुपालिताई वारे यांच्या निधीमधून मंजूर असलेल्या मुकुंदनगर मधील शांतीधाम मंदिराच्या परिसरातील ड्रेनेज लाईन कामाचा आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते शुभारंभ

अहमदनगर इ२७ फेब्रुवारी

मुकुंद नगर येथील शांतीधाम मंदिर परिसराच्या आजूबाजूच्या परिसरातील ड्रेनेज लाईन नादुरुस्त झाल्यामुळे संपूर्ण मंदिर परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले होते ,संपूर्ण परिसरात पाय ठेवणे देखील अवघड झाले होते, जेव्हा ही बाब स्थानिक नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी नगरसेवक निखील वारे यांना सांगितले त्यावेळी त्यानी तात्काळ नगर शहराचे आमदार मान. संग्रामभैया जगताप यांच्या कानावर घालून तात्काळ मंदिराला भेट देऊन ड्रेनेज लाईन चे काम सुरू करण्याचे आदेश दिले होते.

नगरसेविका रूपालिताई निखील वारे यांच्या निधीमधून तत्काळ हे काम मंजूर करण्यात आले आणि आज सकाळी या कामाचा शुभारंभ मंदिराचे पुजारी भोकरे दाम्पत्य यांच्या शुभहस्ते आणि आमदार संग्रामभैया जगताप , मा.नगरसेवक निखील वारे, नगरसेवक समद खान, नगरसेवक फारूक भाई, नगरसेवक खान बाबा, माजी नगरसेवक नसीम खान, अकिल भाई, योगेश ठुबे स्वामी म्हस्के ,परेश वाघूलकर,संजय डुकरे ,तसेच मुकुंद नगर परिसारतील हिंदू मुस्लिम बांधवांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला,

यावेळी स्थानिक हिंदूमुस्लिम बांधवानी ड्रेनेज लाईन चे काम मार्गी लावल्याबद्दल आमदार संग्रामभैया जगताप आणि मा नगरसेवक निखील वारे यांच्या गुलाबपुष्प हार घालून सत्कार केला तसेच महिला भगिनींनी मिठाई भरवून आनंद व्यक्त केला,

आपले मनोगत व्यक्त करताना आमदार संग्रामभैया जगताप यांनी सांगितले की या भागातील ड्रेनेज लाईन चा प्रश्न मार्गी लावला असून लवकरच मुकुंदनगर मंदिर सेवा समितीच्या माध्यमातून मंदिराच्या जीर्णोद्धार कामाचा शुभारंभ करन्यात येईल तसेच मंदिर ला संरक्षक भिंत बांधून मंदिर परिसराचे सुशोभीकरण करण्यात येईल आणि ईतर ही प्रश्न सोडविण्यात येईल असे सांगितले

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version