Home राजकारण खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या मराठा आरक्षण मागणीला मुस्लिम समाजाचा पाठिंबा

खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या मराठा आरक्षण मागणीला मुस्लिम समाजाचा पाठिंबा

मुंबई दि २७ फेब्रुवारी
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषणास बसले आहेत.

शुक्रवारी सकाळपासून या उपोषणास सुरुवात झाली असून महाराष्ट्रभरातून अनेक संघटना तसेच मराठा समाजातील विविध संघटनांचे कार्यकर्ते विविध मराठी बांधव या ठिकाणी उपस्थित असून त्यांनी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या बरोबर उपोषणास प्रारंभ केला आहे.

या उपोषणाला मुस्लिम समाजाने पाठिंबा दिला असून पाठिंब्याचे पत्र मुस्लिम समाजाच्या वतीने खासदार संभाजीराजे छत्रपती यांना देण्यात आले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी कधीही जाती भेद केला नाही सर्व समाजातील जातींना बरोबर घेऊन त्यांनी स्वराज्य स्थापन केले होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अत्यंत विश्वासू आणि जवळच्या लोकांमध्ये मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात होते त्यामुळे खा.संभाजीराजे छत्रपती यांच्या आंदोलनास आमचा पाठिंबा शेवटच्या श्वासापर्यंत राहील असं निवेदन मुस्लिम समाजा तर्फे खासदार संभाजीराजे छत्रपती यांना देण्यात आला आहे

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version