नेवासा दि.५ फेब्रुवारी प्रतिनिधी :-
गाडीवर लिफ्ट देऊन जबरी चोरी करणाऱ्या आरोपीस नेवासा पोलिसांची मुद्देमालासह अटक केली असून आरोपीस न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिस सूत्रांकडून याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, या घटने मधील फिर्यादी ज्ञानदेव यशवंत बर्डे( रा. भातकुडगाव ता. शेवगाव) हे दि. १७ ऑक्टोबर रोजी कामानिमित्त पाचेगाव येथे आले होते. तेथुन भातकुडगाव येथे जाण्यासाठी सायंकाळी ७ वा सुमारास नेवास बस स्टॅण्डसमोर गाडीची वाट बघत असतांना यातील आरोपी याने त्यांना लिफ्ट देवुन नेवासा फाटा येथे जात असताना काझीनगर येथे फिर्यादीस बळजबरी घेवुन जावुन चॉपर लावुन फिर्यादीकडील रोख रक्कम व मोबाईल असा एकुण १९ हजार ५०० रुपये किंमतीचा ऐवज बळजबरीने चोरुन नेला होता. सदर प्रकाराबाबत नेवासा पोलीस स्टेशन गुरनं 790/2021 भादंवि 392 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवुन पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक अहमदनगर, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर, उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव यांनी गुन्हा तपासाच्या अनुषंगाने सुचना दिल्या होत्या. गुन्हा घडल्यापासुन आरोपी हा त्याचे अस्तित्व लपवुन फिरत होता. अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर यांचेकडील सायबर टीमच्या मदतीने तांत्रिक पुराव्या अनुषंगाने निष्पन्न आरोपी रॉकी रमेश चांदणे (वय 23 वर्षे रा. लक्ष्मीनगर, नेवासा) त्यांचे राहते घरातून ताब्यात घेवुन अटक करण्यात आली आहे.
फिर्यादीचा मोबाईल आरोपीच्या ताब्यातुन जप्त करण्यात आला असुन आरोपीस न्यायालयात हजर केले असता त्यास दि. ७ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे, पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि माणिक चौधरी, सपोनि ज्ञानेश्वर थोरात, पोना भागवत शिंदे, पोकॉ अंबादास गिते यांचेसह अपर पोलीस अधिक्षक श्रीरामपुर यांचेकडील सायबर टीमचे पोना फुरकान शेख यांनी केली.