Home क्राईम पन्नास हजाराची लाच घेताना सहाय्यक पोलीस निरीक्षक लाचलूचपतच्या जाळयात

पन्नास हजाराची लाच घेताना सहाय्यक पोलीस निरीक्षक लाचलूचपतच्या जाळयात

सोलापूर दि ८ मार्च ( प्रतिनीधी )

गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी एक लाखाची लाच मागून ५० हजार रुपये स्वीकारताना जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश श्रीकांत कुलकर्णी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
या सहाय्यक पोलीस निरीक्षकाला पुणे या ठिकाणी सोलापूर विभागातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रात्री पावणे दोनच्या सुमारास ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे.

या प्रकरणाची हकीकत अशी की तक्रारदार यांचा मेहुणा याचे विरुध्द जोडभावीपेठ पोलीस स्टेशन, सोलापूर शहर येथे गुन्हा दाखल असुन सदर दाखल गुन्हयाचा तपास यातील आरोपी सपोनि दिनेश श्रीकांत कुलकर्णी हे करीत होते या गुन्हयात तक्रारदार, त्यांची पत्नी, सासु, मोठा मेहुणा, मेहुणी व तीचा नवरा (तक्रारदार यांचा साडु) असे देखील आरोपी होत असल्याबाबत सांगुन जर त्यांना आरोपी करायचे नसेल तर तक्रारदार यांच्याकडे ०१ लाख रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती ५०,०००/- रुपये स्विकारत असताना सोलापूर विभागातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक उमाकांत महाडीक,
पोलीस अंमलदार, पो.ना. कोष्टी, पो.शि. पवार, पो.शि. सण्णके, चा.पो.शि. सुरवसे यांनी केली.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version