Home क्राईम गरीबांच्या ताटातील तांदळाचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना अटक दौंड वरून आणला होता रेशनचा...

गरीबांच्या ताटातील तांदळाचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना अटक दौंड वरून आणला होता रेशनचा तांदूळ ३ लाख ३० हजारांच्या तांदळासह १५ लाख किमतीचा बनावट नंबरचा ट्रक जप्त कर्जत पोलिसांची कामगिरी

कर्जत दि.७ मार्च

गरीब सर्वसामान्य नागरिकांचा तांदूळ त्यांना न देता काळ्याबाजारात विक्रीसाठी नेत असलेल्या एका बनावट नंबरच्या ट्रक सह 3 लाख तीस हजारांच्या तांदळाचे पोते कर्जत पोलिसांनी पकडले आहेत.

शासकीय रेशनचा तांदूळ काळ्या बाजाराने खरेदी करून तो खुल्या बाजारात नेऊन चढ्या भावाने विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या दौंड तालुक्यातील दोघांवर कर्जत पोलीसांनी सापळा रचून कारवाई केली आहे.दौंड तालुक्याच्या काळ्या कमाईच्या व्हाया ‘कर्जत कनेक्शन’मुळे आणि सतर्कतेमुळे सर्वात मोठी कारवाई करण्यात कर्जत पोलिसांना यश आले आहे.

याबाबत पोलिसांना माहिती मिळाली होती की दौंड तालुक्यातील रेशनचा तांदूळ कर्जत मध्ये आणून विक्री होत आहे त्यानुसार पोलिसांनी या काळ्याबाजारात विक्री करण्यासाठी आणण्यात येणाऱ्या तांदळावर लक्ष ठेवले होते

पोलिसांनी याबाबत सापळा रचून तसेच पुरवठा कार्यालयातील अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन कर्जत तालुक्यातील बिटकेवाडी परिसरातील पिरफाटा येथे असलेल्या एम.एच ४२ ए क्यू ७३७३ या ट्रकची तपासणी केली  असता पोलीस आणि पुरवठा विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी केलेल्या तपासणीत तांदूळाच्या गोण्या आढळून आल्या होत्या .

याबाबत ट्रक चालक ज्ञानेश्वर कल्याण काळे यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने अखेर पोलिसांनी हा ट्रक पोलीस ठाण्यात आणून या ट्रकची दौंड मध्ये चौकशी केली असता ट्रक चा नंबर खोटा असल्याचे समोर आली असून हा ट्रक दौंड मधून कर्जत मध्ये का आणण्यात आला या तांदळाच्या गोण्या कोणाला विकण्यासाठी आणण्यात आल्या होत्या याबाबत आता पोलिस आणि पुरवठा विभाग चौकशी करणार आहे यामुळे रेशन मधील धान्य काळ्याबाजारात विकणारी मोठी साखळी समोर येऊ शकते.

कर्जत पोलिसांनी याप्रकरणी पो. कॉ.सुनिल खैरे यांच्या फिर्यादीवरून आरोपींवर जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ चे कलम ३ व ७ तसेच भा.द.वी. कलम ४२०,४६५,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून या प्रकरणात ट्रक चालक ज्ञानेश्वर कल्याण काळे आणि माऊली उर्फ ज्ञानेश्वर अशोक पवार या दोघांना अटक करण्यात आली आहे.

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक मनोज पाटील अपर पोलीस अधिक्षक सौरभ कुमार अग्रवाल,उप विभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस स्टेशनचे पो.नि चंद्रशेखर यादव , सपोनि दिनकर मुंढे, पोलीस अंमलदार पांडुरंग भांडवलकर, पोना शाम जाधव, सुनील खैरे, गोवर्धन कदम, मनोज लातूरकर, अमित बर्डे, सचिन वारे यांनी केली

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version