अहमदनगर दि.११ जानेवारी
बोल्हेगाव परिसरातील गांधीनगर भागात राहणारे सेवानिवृत्त पोलिस कर्मचारी गिन्यादेव नामदेव जाधव, ( वय ६० हल्ली रा. पाथर्डी ) हे दुपारी दुचाकीवरुन मोहज पाथर्डी येथून त्यांच्या मुलाकडे जाण्यासाठी दुचाकीवरून जात असताना कोल्हार घाटमार्गे शेंडी बायपास वडगाव गुप्ता शिवारात नदीजवळून जात असताना त्यांची सून सोनाली संतोष जाधव हिने हात दाखवून गाडी थांबण्यास सांगितले तेव्हा सासरे गिन्यादेव नामदेव जाधव थांबले ते गाडी स्टॅण्डवर लावत असताना सुन सोनाली जाधव हिने सासऱ्याला खाली पाडून त्यांच्या अंगावरील बसली तसेच बाळासाहेब सातपुते याने हात धरले व वैभव सातपुते याने नाक दाबून तोंडात विषारी बाटलीतील औषध ओतले व तू पेन्शनर पोलिस असल्याने मी तुझ्यावर दाखल केलेल्या गुन्ह्यात तुला पोलिसांनी अटक केली नाही आता तुला कोण वाचवायाला येते? तुला वाचवणारे कुणी नाही असे म्हणून शिवीगाळ करून तोंडात विष ओतून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
ही घटना भरदुपारी अडीच वाजता घडली. गिन्यादेव नामदेव जाधव यांनी एमआयडीसी पोलिसात फिर्याद दिल्यावरुन आरोपी सून सोनाली संतोष जाधव, वैभव उर्फ महेश बाळासाहेब सातपुते, बाळासाहेब सातपुते, यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसात भा.द.वि. कलम ३०७, ५०४ प्रमाणे खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच डिवायएसपी अजित पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली.
या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक पाठक हे पुढील तपास करीत आहेत.