Home Uncategorized पाथर्डी बाजारतळा जवळ बांधण्यात येणाऱ्या स्वच्छतागृहास व्यापाऱ्यांचा विरोध

पाथर्डी बाजारतळा जवळ बांधण्यात येणाऱ्या स्वच्छतागृहास व्यापाऱ्यांचा विरोध

पाथर्डी दि.५ एप्रिल
आमदार मोनिका राजळे यांच्या निधीतून पाथर्डी नगर परिषदेमार्फत बांधण्यात येणाऱ्या शौचालयाची जागा ही चुकीची असल्याने सर्वसामान्य व्यापाऱ्याला व बाजार तळावर असणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना याचा त्रास होणार आहे. या शौचालयाचे ठिकाण बदलून हे काम त्वरित थांबवण्याची मागणी बाजारकरी व्यापाऱ्यांनी करत पाथर्डी नगर परिषदेसमोर संदीप काकडे यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण सुरु केले होते . संदीप काकडे, अण्णा हरेर, सुरेश हंडाळ, अंबादास पालवे, बजरंग धस, अनिल लाटे, गणेश शिंदे, उमेश खैरे, संजय काटे, संभाजी धस, गणेश टेके, संजय टेके,नंदकिशोर भागवत, सचिन काकडे आदी व्यापारी यात सहभागी झाले होते.

बाजारकरी व्यापाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि,नगरपरिषदेच्या मार्फत सुरु असलेले शौचालयाचे बांधकाम चुकीच्या जागी असून तिथे सर्व सामान्या व्यापाऱ्यांना त्रास होणार आहे. आधीच बाजारतळ छोटे आहे.त्यामुळे सर्व सामान्य जनता आणि व्यापारी यांना जागेचा त्रास होणार आहे. येथे आठवडे बाजारकरी व्यापारी आपली दुकाने लावतात.तर दररोज भाजी पाल्याचा बाजार भरवण्यात येतो त्यामुळे याठिकाणी शौचालय झाल्यास दुर्गंधी पसरणार असून व्यापारी आणि नगरपरिषदेच्या गाळे धारकांना याचा त्रास होणार आहे. तरी संबंधित काम बंद करण्यात येऊन. बाजारकरी,गाळे धारक आणि इतर व्यापारी यांना होणार नाही आश्या ठिकाणी हे शौचालय बांधण्यात यावे अशी मागणी पाथर्डी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे.

पाथर्डी शहारत शौचालय नाही ते बांधण्यात यावे यावरून अनेकदा नागरपरिषदेतील सत्ताधाऱ्यांना लोकांनी धारेवर धरले.आंदोलने झाली.त्यांनतर आमदार मोनिका राजळे यांच्या निधीतून शौचालय बांधण्यासाठी पाथर्डी नगरपरिषदेला २० लाखांचा निधी दिला.

नगरपरिषदेच्या खाली असलेल्या जागेवर हिंद वसतिगृह समोर हनुमान मंदिर जवळ हे शौचालय नियोजित असतांना माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांनी यावर बांधण्यास आक्षेप घेतला.त्यांनतर हि जागा बदलून बाजार तळातील गंगा माता बोरवेल समोर बाजारकरी बसत असलेल्या ओट्या जवळ हे शौचालय बांधण्याचे काम सुरु आहे.हि जागा चुकीची असून येथील व्यापाऱ्यांना त्रास दायक आहे. असे म्हणत शौचालय बांधण्यास बाजारकरी व्यापाऱ्यांनी विरोध दर्शवला होता अखेर सायंकाळी उशिरा माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड यांनी मध्यस्ती केल्या नंतर व मुख्याधिकारी संतोष लांडगे यांनी दिलेल्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version