Home क्राईम पारनेर,नेवासा,गंगापूर तालुक्यातील अनेकांना दामदुप्पट योजनेची लालच दाखवून फसवणारा ‘तो’ म्होरक्या अखेर पोलिसांना...

पारनेर,नेवासा,गंगापूर तालुक्यातील अनेकांना दामदुप्पट योजनेची लालच दाखवून फसवणारा ‘तो’ म्होरक्या अखेर पोलिसांना आला शरण

नेवासा दि ५ मार्च
सध्या शेयर बाजार ,तसेच विविध खाजगी फायनान्स, कंपन्या,यांचे फोन मेसेज रोज हजारो लोकांना येत असतात इतके पैसे गुंतवा आणि काही दिवसात दामदुप्पट मिळवा या दामदुप्पटच्या आमिषाला काही लोक भुलतात आणि मग फसल्याच लक्षात येताच पोलीस स्टेशनला धाव घेतात.

तर काही प्रकरणात फसवणारे जवळचेच लोक असल्याने तोंड दाबून बुक्क्याचा मार नागरिकांना सहन करावा लागतो असाच प्रकार अहमदनगर जिल्ह्यात घडला असून दामदुप्पट पैसे देतो असे आमिष दाखवून नागरिकांना लुबााडून फरार झालेला  टोळीच्या म्होरक्या पोलिसांना शरण आला आहे.

यातील एका आरोपीने शेअरबाजारात पैसे गुंतविण्यासाठी अनेक दिवसांपासून नगरमध्ये कार्यालय उघडले होते. लोकांना भुलवण्यासाठी हा देखावा उभा करण्यात आला होता सुरुवातीला अनेकांना दामदुप्पट पैसे देण्यात आले मात्र नंतर शेअर्स बाजार ढासळल्याचे सांगून सर्वच कारभार डबघाईस आला. लोकांचा पैशाचा तगादा वाढू लागल्याने चार महिन्यांपूर्वीच नगरमधील शेअर्स कंपनीचे कार्यालय बंद केले गेले.

शिक्षक संघटनेचा एक नेत्यासह पारनेरच्या टोळीचा पाच-सहा वर्षांपासून या फसवणुकीचा हा धंदा सुरू असल्याची माहिती आता समोर येत आहे. काही प्रतिष्ठित लोकांना या दामदुप्पट योजनेत चांगला चुना लावल्याचे माहिती समोर आली असून या दामदुप्पट योजनेत काही नातेवाईकच एकमेकांशी संबंधित असल्याने फसवणूक होऊनही पोलीस स्टेशनला जाण्याचे धाडस कोणी केले नव्हते.

नेवासा तालुक्यातील भानस हिवरा येथील प्रसाद भणगे यांनी आपली फसवणूक झाली हे लक्षात येताच थेट पोलीस स्टेशन गाठून फसवणाऱ्या टोळीमधील सहा जणांच्या विरोधात तक्रार नोंदवली आणि मग या टोळीचा भांडाफोड झाला आहे.

फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये शिक्षक
नेता असल्याने फसवणूक झालेल्यांमध्ये शिक्षकांची संख्या जास्त आहे या फसवणुकीची व्याप्ती अहमदनगर जिल्ह्यासह औरंगबाद जिल्ह्यात असल्याचं समोर आले आहे.

नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच या प्रकरणातील म्होरक्या वैभव चेमटेसह त्याचे साथीदार फरार झाले होते पोलीस आरोपींचा शोध घेत असतानाच यातली म्होरक्या वैभव आनंत चेमटे गुरुवारी पोलिसांना शरण आला आहे.

वैभव चेमटे याला न्यायालया समोर हजर केले असता ९ मार्चपर्यंत न्यायालयाने वैभव चेमटे यास पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असून पुढील तपासामध्ये वैभव चेमटे याच्या बरोबर आणखी किती लोक यामध्ये सामील आहेत तसेच फरारी पाच आरोपींचा शोध घेण्यासाठी मदत होईल आणि किती लोकांना किती रकमेला या प्रकरणात फसवले याबाबतची माहिती समोर येण्याची शक्यता बाजीराव पोवार यांनी वर्तविली आहे.

तसेच या प्रकरणात ज्या नागरिकांची फसवणूक झाली आहे त्यांनी नेवासा पोलीस स्टेशनशी संपर्क करावा असे आवाहनही नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी केले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version