Home राजकारण प्रभाग क्रमांक ९ (क) मधील पोटनिवडणूकीवर टांगती तलवार कायमच निलेश म्हसे यांच्या...

प्रभाग क्रमांक ९ (क) मधील पोटनिवडणूकीवर टांगती तलवार कायमच निलेश म्हसे यांच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिले हे आदेश

अहमदनगर सुथो-
अहमदनगर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ९ क या प्रभागाची पोटनिवडणूक जाहीर झाली असून. निवडणुक निर्णय आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. मात्र या निवडणुकीवर अद्यापही टांगती तलवार आहे. २०१८मध्ये या प्रभागाची निवडणूक झाली त्यावेळी या प्रभागातील उमेदवार निलेश म्हसे यांनी सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला फॉर्म भरण्यासाठी जे निर्देश दिले आहेत हे निर्देश पाळले नाहीत असा आक्षेप नोंदवत सर्व उमेदवारांविरुद्ध हरकत घेतली होती. उमेदवारांनी अर्ज भरताना निवडणूक अर्जातील अनेक रकाने मोकळे ठेवले असल्याची हरकत घेतली होती. त्यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी वामन कदम यांनी ही हरकत फेटाळल्यानंतर निलेश म्हसे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात मध्ये धाव घेत निवडणुकीला स्थगिती आणावी अशी याचिका दाखल केली . मात्र निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून संपूर्ण महानगरपालिकेच्या प्रभागांची निवडणुका असल्याने आपण स्थगिती देऊ शकत नाही.निवडणुकी नंतर आपण याबाबत आव्हान देऊ शकता याबाबत जिल्हा व सत्र न्यायालयात आपण अर्ज दाखल करू शकतात असा निर्णय देत औरंगाबाद खंडपीठाने अहमदनगर जिल्हा न्यायालयात याचिका दाखल करण्याचे सांगितल्यानंतर निलेश म्हसे यांनी अहमदनगर जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिकेवर सुनावणी होऊन न्यायालयाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेश जैसे थे ठेवले होते.यावर पुन्हा निलेश म्हसे यांनी औरंगाबाद हायकोर्टामध्ये धाव घेत अहमदनगर जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले .औरंगाबाद हायकोर्टा मध्ये याची सुनावणी सुरू असून सोमवार ६ डिसेंबर रोजी या प्रकरणावर सुनावणी झाली निलेश म्हसे यांच्या वतीने ॲड. गजानन कदम यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की प्रभाग क्रमांक ९(क) प्रभागासाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. त्यामुळे निकाल जाहीर झाल्यानंतर याचिकाकर्त्याने दाखल केलेली याचिका प्रभावित होऊ शकते यावर न्यायालयाने याचिकाकर्ते निलेश म्हसे यांचा हक्क अबाधित ठेवत पोटनिवडणुकीत जो निकाल लागेल तो निलेश म्हसे यांच्या याचिकेच्या अधीन राहील असे आदेश देऊन पुढील सुनावणी जानेवारी महिन्यात ठेवली आहे. त्यामुळे या निवडणूकीवरचे तात्पुरते संकट टाळले असले तरी निवडून आलेल्या उमेदवारावर या निकालाची टांगती तलवार राहणारच आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version