Home Uncategorized भिंगार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिर देशमुख ‘उकृष्ट अपराध सिद्धीचे मानकरी’

भिंगार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिर देशमुख ‘उकृष्ट अपराध सिद्धीचे मानकरी’

अहमदनगर – दि. २० जानेवारी
अहमदनगर शहरातील भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिर देशमुख यांना पोलीस महसंचालकांच्या उत्कृष्ट अपराध सिद्धी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

शिशिर देशमुख परभणी येथे पोलीस उपनिरीक्षक म्हणून नवा मोंढा पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असताना एका आव्हानात्मक खून प्रकरणाचा तपास शिशिर देशमुख यांच्या सहकाऱ्यांनी  लावला होता. तसेच तापस करून न्यायालयात आरोपीस जन्मठेपेची शिक्षा लागली होती.

 

त्यामुळे पोलीस महासंचालक यांचे उकृष्ट अपराध सिद्धी ५००० आणि प्रमाणपत्र असे बक्षीस सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिर देशमुख यांना जाहीर झाले.

तसेच त्यांच्या सोबत असणारे परभणीच्या नवा मोंढा पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोउपनि, प्रकाश कापुरे, सपोफौ, प्रकाश कुकडे यांना पण हा सन्मान मिळाला आहे.

अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षकमनोज पाटील,अपर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी शिशिर देशमुख यांचे अभिनंदन केले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version