Home Uncategorized महानगर पालिकेचे मेहेर लहारे यांचे अखेर निलंबन शिवसेनेच्या आंदोलनाला यश

महानगर पालिकेचे मेहेर लहारे यांचे अखेर निलंबन शिवसेनेच्या आंदोलनाला यश

अहमदनगर दि ३ फेब्रुवारी
अहमदनगर महानगरपालिकेचे वादग्रस्त ठरलेले मेहेर लहारे यांचे निलंबन करण्यात आला आहे. याबाबत महानगरपालिकेचे आयुक्त शंकर गोरे यांनी निलंबनाचे आदेश काढले आहेत.

शिवसेना याबाबत आक्रमक झाली होती आज शिवसेनेच्या वतीने महानगरपालिकेच्या आयुक्त शंकर गोरे यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आले होते.

माजी शहर प्रमुख दिलीप सातपुते,नगरसेवक अनिल शिंदे,  युवासेनेचे अध्यक्ष विक्रम राठोड महिला संघटक स्मिता अष्टेकर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, माजी नगरसेवक सचिन जाधव,अभिषेक कळमकर, दीपक कावळे, गौरव ढोणे यांच्यासह नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी आज मेहेर लहारे यांच्यावर कारवाई करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेत आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले होते

जोपर्यंत आदेश निघत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार असा इशारा दिल्यामुळे अखेर आयुक्तांनी यांचे निलंबनाचे आदेश काढले आहेत

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version