Home क्राईम मांडूळ तोफखाना पोलिसांनी केलं वनविभागाच्या हवाली

मांडूळ तोफखाना पोलिसांनी केलं वनविभागाच्या हवाली

अहमदनगर दिनांक १९ एप्रिल
अहमदनगर शहरातील औरंगाबाद रोड जवळील इंद्राणी हॉटेल जवळ असलेल्या एका मैदानामध्ये काही मुलं मांडूळ घेऊन जात असल्याचं या भागातील सागर अवसारे, अनिल बटुळे आणि उमेश गांगुर्डे यांच्या लक्षात आल्या नंतर यांनी मांडूळ घेऊन जात असलेल्या त्या मुलांना विचारपूस केली मात्र त्यांच्याकडून मिळालेल्या उडवाउडवी च्या उतारामुळे त्यांना खात्री झाली की हे मांडूळ ही मुलं दुसऱ्या काहीतरी कामासाठी घेऊन जात आहेत.

त्या नंतर सागर अवसरे याने तोफखाना पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके यांना फोन करून याबाबतची माहिती दिली समाधान सोळंके यांनी तातडीने आपले सहकारी दत्तात्रय जपे आणि गोमसाळे यांच्या सह जाऊन मांडूळ ताब्यात घेऊन वनविभागाचे के.एम. शेरमाळे यांच्या हवाली करण्यात आलंय.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version