Home क्राईम मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षाच्या शिर्डी येथे बेवारस बालकांच्या शोध मोहिमेत सापडली अकरा...

मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षाच्या शिर्डी येथे बेवारस बालकांच्या शोध मोहिमेत सापडली अकरा बालके,

अहमदनगर दि.१९ जानेवारी
अहमदनगर पोलीस दलातील मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षाच्या वतीने गुरुवारी शिर्डी येथे बेवारस बालकांचा शोध घेण्यात आला. या शोध मोहिमेत शिर्डी परिसरात अकरा बालके बेवारस आढळून आली होती. या बालकांच्या कुटुंबीयांचा शोध घेऊन ही बालके पुन्हा त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आली आहेत.

तसेच पालकांनी यापुढे या बालकाची काळजी घेणे चुकीची कामे करण्यास प्रवृत्त न करणे व पुढील उपयोजना बाबत पोलीस निरीक्षक भीमराव नांदुरकर यांनी समुपदेशन केले.

शिर्डी मध्ये बाहेरून आलेल्या भटक्या कुुुटुंबतील अनेक बालकांना त्यांचे कुटुंबीय भिक्षा मागण्यासाठी प्रवृत्त करत असतात त्यामुळे या मुलांचे भवितव्य अंधारात असते अशा मुलांचा शोध घेऊन त्यांना पुन्हा एकदा शिक्षणाची गोडी लागावी म्हणून त्यांचे व त्यांच्या पालकांचे समुपदेशन करण्यात आले.

या मोहिमेत मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षाचे पोलीस निरीक्षक भीमराव नदृकर, पो हे कॅ सोमनाथ कांबळे , मपो हेकॉ. अनिता पवार, मपोकॉ आरती काळे,मपोकॉ रुपाली लोहळे या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version