चंद्रपूर
चंद्रपुरात राष्ट्रवादी युवती काँग्रेसची शहर अध्यक्षला वाहन चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. आपल्या दोन साथीदारांसह विशिष्ट पद्धत वापरून लॉक नसलेल्या मोपेड चोरून विकण्याचा गोरखधंदा ही टोळी करत होती. वैष्णवी देवतळे असे या युवती प्रमुख कार्यकर्तीचे नाव आहे. तर मनीष पाल आणि सौरभ चांडखेडे असे इतर साथीदारचे नावे आहेत या टोळीकडून पोलिसांनी काही वाहने हस्तगत केले आहे तसेच अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे
चंद्रपूरच्या स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या या कारवाईत युवतीसह इतर दोन साथीदारांनी चोरलेली 11 वाहने जप्त करण्यात आली आहेत. पोलिसांनी सध्या या तिघांना कोठडीत ठेवले असून त्यांच्याकडून अन्य काही ठिकाणचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.