Home राजकारण वाजली नाही खडसेंची सीडी मात्र भाजपने लावून अनेकांच्या मागे ईडी वाजवली सर्वांची...

वाजली नाही खडसेंची सीडी मात्र भाजपने लावून अनेकांच्या मागे ईडी वाजवली सर्वांची सीडी

मुंबई – दि २३ फेब्रुवारी
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपवर नाराज होऊन जेव्हा राष्ट्रवादी कांग्रेस मध्ये प्रवेश केला तेव्हा माझ्याकडे भाजप मधील काही नेत्यांविरोधात सर्व काही पुरावे आहेत आणि त्याची एक सीडी आहे वेळ आल्यावर ती सीडी मी वाजविल असं ते नेहमी सांगत होते. मात्र त्यांच्यावरच अनेक चौकशा लागून सुद्धा ती सीडी बाहेर आली नव्हती. मात्र आता एकनाथ खडसे राष्ट्रवादी मध्ये येऊन जुने झाले मात्र त्यांची सीडी काही वाजलीच नाही.

भारतीय जनता पार्टीने अनेकांच्या मागे ईडीची चौकशी लावल्याचा दिसून येतंय राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल अनेक लोकांची चौकशी ईडी द्वारे सध्या सुरू आहे.

राष्ट्रवादीचे मंत्री आणि गेल्या काही दिवसांपासून टीव्हीवर ईडी बद्दल सतत बोलणारे नवाब मालिकांची आज ईडीकडून चौकशी सुरू आहे सकाळी साडेचार वाजेच्या दरम्यान ईडीची टीम नवाब मलिक यांच्या घरी धडकली होती. नवाब मलिक यांना ईडीच्या कार्यालयात घेऊन गेले असून सकाळी पावणेआठ पासून नवाब मलिक यांची चौकशी सुरू असल्याचे सूत्रांकडून समजलय.

राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केलीय नवाब मलिक यांच्यावर ईडीची कारवाई होणार असा अंदाज असल्याचं शरद पवार यांनी बोलून दाखवले तर राष्ट्रवादीच्या अनेक मोठ्या नेत्यांनी या चौकशीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे भाजपकडून ईडीचा गैरवापर केल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून केला जातोय.

भाजपमधून राष्ट्रवादीत आलेल्या माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे खरच काही सीडी असेल तर त्यांनी सीडी वाजवली पाहिजे असे मतही आता राष्ट्रवादीचे काही नेते बोलून दाखवत आहेत.

राष्ट्रवादी युवक काँग्रेस आता ईडी कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसने दिला असून यामुळे आता मुंबईमध्ये चांगलीच घमासान होण्याची चिन्ह आहेत नवाब मलिक हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते असून गेल्या काही दिवसांपासून त्यांनी ईडीवर चांगलेच तोंडसुख घेतले होते. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कार्यालयासमोर मोठा बंदोबस्त तैनात केला आहे

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version