Home राजकारण विश्व मानवाधिकार परिषदेच्या महाराष्ट्र युवक प्रदेशअध्य्क्षपदी नावेद शेख यांची नियुक्ती

विश्व मानवाधिकार परिषदेच्या महाराष्ट्र युवक प्रदेशअध्य्क्षपदी नावेद शेख यांची नियुक्ती

अहमदनगर दि.१ फेब्रुवारी
विश्व मानवाधिकार परिषदेचा महाराष्ट्र युवक प्रदेशअध्य्क्षपदी नगर शहरातील नावेद शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या निवडी बाबतचे पत्र विश्व मानवाधिकार परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष एम.आर.अन्सारी यांनी दिले असून या आधी अहमदनगर जिल्ह्यात नावेद शेख हे महाराष्ट्र प्रदेशचे अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष म्हणून काम करत असताना अनेक प्रश्नांबाबत त्यांनी पाठपुरावा करून अनेक कामे मार्गी लावली आहेत.

राजकारण न करता विश्व मानवाधिकार परिषद ही समाजा मधील प्रश्नाबाबत नेहमीच आक्रमक भूमिका घेऊन ते सोडवण्यासाठी पाठपुरावा करत असते याच माध्यमातून नावेद शेख यांनी शहरातील अनेक प्रश्नांबाबत वेळोवेळी प्रशासनाबरोबरच संघर्ष केला आहे.या कार्याची दखल घेऊन विश्वमानवाधिकार परिषदेने त्यांना महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष पदी संधी दिली आहे.

पुढील काळात युवकांना बरोबर घेऊन समाज उपयोगी कामे करण्याचा मानस नावेद शेख यांनी बोलून दाखवला आहे. तरुण पिढी राजकारणात जाऊन चुकीच्या पायंड्यात गुरफटून जाते त्यापेक्षा समाज उपयोगी कामे करून नागरिकांचे कामे करण्यात मानवाधिकार परिषदेला रस असल्याने नक्कीच पुढील काळात युवक मानवाधिकार परिषदेकडे आकर्षित होतील असा विश्वास असल्याचे नावेद शेख यांनी सांगितलंय.

नावेद शेख यांच्या निवडी बाबत महाराष्ट्र प्रदेश सचिव शफीबाबा सय्यद, जिल्हाध्यक्ष अज्जू भाई शेख,महाराष्ट्र SCST सेल चे उपाध्यक्ष अॅड. निलेश कांबळे, जिल्हा अध्यक्ष(अल्पसंख्याक)अल्ताफ शेख, शहर जिल्हा अध्यक्ष-चंद्रकांत उजागरे, युवक जिल्हा अध्यक्ष शहेजाद खान, उप जिल्हा अध्यक्ष शहानवाज शेख,अल्पसंख्याका जिल्हा महासचिव-शादाब कुरेशी, शहर जिल्हा उपाध्यक्ष ललित कांबळे, वाहीद शेख, शरिफ सय्यद यांच्या सह
शहरातील विविध संघटना आणि मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version