अहमदनगर दि.१ फेब्रुवारी
अखिल भारतीय मेहतर समाज संघटना यांच्या वतीने पंजाब येथील आम आदमी पार्टी पक्षाचे नेते भगवंत मान यांच्या निवडणूक प्रचार दरम्यान 26 जानेवारी रोजी स्वतःच्या गळ्यातील हार काढून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला घालून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला आहे. त्यामुळे अखिल भारतीय मेहेतर समाज संघटना यांच्या वतीने मार्केट यार्ड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून भगवंत मान यांचा निषेध करत जोडे मारून पुतळा दहन करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
यावेळी जिल्हाध्यक्ष सनी खरारे, जिल्हा उपाध्यक्ष राहुल लखन, धीरज बैद ,नरेंद्र तांबोळी, कुणाल बैद ,अभिषेक भगवाने, विकी चावरे ,संजय खरे, बाबू लाल बेगी, धीरज बैद ,विक्रम चव्हाण ,प्रशांत पाटोळे ,तुषार खळेकर ,जालिंदर खराडे ,विशाल ढकोलीया, सुधाकर गिलशेर ,एडवोकेट योगेश देवकर आदी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.