अहमदनगर- प्रतिनिधी
नगर तालुका पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या बायोडिझेल तस्करी प्रकरणांमध्ये शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते यांचा संशयित आरोपी म्हणून नाव आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती.मात्र दिलीप सातपुते यांच्या समर्थकांनी ही बाब खटकली असून.राजकीय दबावापोटी दिलीप सातपुते यांचे नाव गोवण्यात आल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.आता फेसबुक आणि व्हाट्सअप वर दिलीप सातपुते यांच्या समर्थकांनी दिलीप सातपुते यांना कसं अडचणीत आणल आहे. याबाबतचा पोस्ट टाकण्यास सुरुवात केली आहे
नगर शहरातील काही राजकीय घटनांवरून दिलीप सातपुते यांचे नाव गोवण्यात आल्याचा आरोप त्यांच्या समर्थकांनी केला आहे. दरम्यान याप्रकरणी अटक पूर्व जामीन मिळावा यासाठी दिलीप सातपुते यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात वकीलांकरवी अर्ज दाखल केला असून या अर्जावर शनिवारी सुनावणी होणार आहे. मात्र सोशल मीडियावर सध्या दिलीप सातपुते समर्थकांनी वुई सपोर्ट दादा नावाने चांगलीच मोठी मोहीम उघडली आहे.