Home क्राईम महाविकास आघडी सरकारच्या राज्यात गुंडगिरी वाढली सर्वसामान्य नागरिकांसह विरोधी पक्षातील नेत्यांना येतायेत...

महाविकास आघडी सरकारच्या राज्यात गुंडगिरी वाढली सर्वसामान्य नागरिकांसह विरोधी पक्षातील नेत्यांना येतायेत धमक्या माजी मंत्री राम शिंदे यांनी घेतली पोलीस अधीक्षकांची भेट

अहमदनगर दि ३ एप्रिल
महाविकास आघडी सरकार राज्यात स्थापन झाल्या पासून राज्यात गुंडगिरी वाढत असून भर दिवसा हातात कोयते तलवारी घेऊन गुंड गोर गरीब जनतेवर दहशद करत असल्याचं चित्र पाह्यला मिळत आहे तर विरोधी पक्षाच्या नेत्यांना धमकी देण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गुंड करत असल्याची टीका भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांनी केली आहे.

जामखेड कर्जत मतदारसंघाचे आमदार रोहित पवार हे त्यांच्या समर्थकांच्या माध्यमातुन वेळोवेळी जीवे मारण्याची धमकी देत असल्याची तक्रार भाजपा सरचिटणीस सचिन सखाराम पोटरे यांनी केलीय.भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी या प्रकरणात लक्ष घालून संबंधितावर कडक कार्यवाही करावी अशी मागणी जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे केली आहे.

माजी मंत्री राम शिंदे, जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे , सरचिटणीस सचिन पोटरे, ,दिलीप भालसिंग , अल्लाउद्दीन काझी ,शेखर खरमरे , पप्पू शेट धोदाड , सुनील काळे ,शोयब काझी , गणेश पालवे,यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी अधीक्षक पाटील यांची भेट घेवून याबाबत निवेदन दिले आहे. जिवे मारण्याची धमकी देणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांविरूध्द गुन्हा दाखल व्हावा, १५ दिवसांच्या आत तडीपारीचा प्रस्ताव सादर करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. अन्यथा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

भाजपाचे काम करत असताना विरोधक या नात्याने सातत्याने आमदार रोहित पवार यांच्या चुकीच्या धोरणांवर व राजकीय भूमिकांवर, तसेच माजी मंत्री शिंदे यांनी त्यांच्या कार्यकाळात मंजूर केलेल्या व सद्यस्थितीत अपूर्ण असलेल्या विकासकामांबद्दल पक्षाच्या वतीने मिडीया, सोशल मिडीया व विविध वृत्तपत्रात भाजपाची भूमिका मांडत असतो. यामुळे धांडेवाडी येथील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नितीन धांडे हे गुंड प्रवृत्तीच्या व अतिगंभीर गुन्हे दाखल असलेल्या कार्यकर्त्यांना पुढे घालून सातत्याने मोबाईलवर व प्रत्यक्षात समोर आल्यावर देखील ‘तू आमदार रोहीत पवार यांच्या विरोधात बोलत जावू नकोस, हे खूप मोठ घराणं आहे, तुला कधी गायब करतील हे कोणालाच कळणार नाही आणि आता यापुढे जर तू त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या घराण्याबद्दल विरोधात बोललास, तर तुला आम्ही आमच्या साथीदारांकरवी जिवे मारुन टाकू’ असे धमकावले असल्याचे पोटरे यांनी म्हटले आहे.

या आधीही बहिरोबावाडी येथील राष्ट्रवादीचे पदाधिकारी दिपक यादव व सुधीर यादव यांनी मला फेसबूक व प्रत्येकाक्षात जिवे मारण्याची धमकी देवून सोशल मिडियावर माझी बदनामी केली. कर्जत तालुक्यात दहशत असलेल्या शिवाजी गुळमे, बापु काळे, संदीप गावडे यांच्यापासून जिवीतास धोका असल्याचेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version