अहमदनगर दि.२१ डिसेंबर
अहमदनगर शहराच्या बोल्हेगाव परिसरात एका 32 वर्षीय पुरुषाला हानीट्रॅप मध्ये गुंतवण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र त्या 32 वर्षे पुरुषाच्या हुशारीने हा प्रयत्न हाणून पडला असून याप्रकरणी तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये एका महिला आणि दोन अनोळखी पुरुषांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील 32 वर्षीय पुरुष हा मजुरीचा व्यवसाय करत असून 20 डिसेंबर रोजी त्याच्या मोबाईलवरून त्याने एका अनोळखी नंबर वरून फोन करून मुली आहेत का ? असे विचारले समोरून त्या अनोळखी महिलेने त्याच्या नंबर वर व्हाट्सअप द्वारे मुलींचे फोटो पाठवले आणि भेटायचे असेल तर बोल्हेगावला ये असे सांगितले त्यानंतर त्या अनोळखी महिलेने त्या पुरुषाला भेटण्यासाठी बोल्हेगाव येथील भरत बेकरी समोर बोलवले आणि आपल्या घरी नेले.तो 32 वार्षीय पुरुष त्या महिलेच्या घरात जाताच त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या महिलेने आणि एक अनोळखी तरुण आणि वयोवृद्ध पुरुषाने त्या 32 वर्षे तरुणास दमदाटी करण्यास सुरुवात केली व तू एक लाख रुपये अन्यथा तू आमच्या घरात घुसून अत्याचाराचा प्रयत्न केला असा गुन्हा दाखल करू अशी धमकी देण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्या पुरुषने आपल्याकडे पैसे नाहीत तेव्हा नंतर हा सौदा 80 हजार रुपयापर्यंत आला त्यालाही तो पुरुष तयार न झाल्याने अखेर त्या महिलेने 25000 रुपये तरी दे अन्यथा तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करावा लागेल असे म्हणून त्या महिलेने तीचे व तीच्या मुलीचे स्वता:च कपडे फाडु लागली हा सर्व प्रकार पाहून त्या 32 वर्षे तरुणाने त्या रूममधून कसेबशी आपली सुटका करून धूम ठोकली.
यानंतर घाबरलेल्या त्या 32 वर्षीय पुरुषाने थेट तोफखाना पोलीस स्टेशन गाठून पोलिसांना सर्व हकीगत सांगितली व पोलिसांनी या प्रकरणाची शहानिशा करून त्या 32 वर्षे पुरुषाच्या फिर्यादी वरून एक महिला व दोन पुरुषांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.