अहमदनगर दि.२१ डिसेंबर
अहमदनगर शहरातील सावेडी उपनगरात प्रसिद्ध असलेल्या एका मावा सेंटर वर तोफखाना पोलिसांनी छापा टाकला आहे.पाईपलाईन रोड वरील एकविरा चौकात असलेल्या प्रसिद्ध मावा सेंटरवर तोफखाना पोलिसानी छापा टाकून तयार मावा तसेच मावा बनवण्यासाठी असलेले यंत्र कच्चा तंबाखूजन्य पदार्थ याठिकाणी सापडले आहे.
मयूर नावाने फेमस असलेल्या मावा सेंटर खुले आम सुरू होते तरुणांना कर्क रोगाचे आमंत्रण देणाऱ्या या गुटख्यामुळे अनेकांचे आयुष्य बरबाद होत आहे पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत होत आहे हा मावा बनवण्याचा कारखाना पाईपलाईन हडको मधील एका घरामध्ये सुरू होता अत्यंत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मावा बनवण्याचे काम सुरू होते.