Home राजकारण नगर शहरात हिंदू मुस्लिम बांधव मिळून मुकुंद नगर मधील मंदिराचा करणार...

नगर शहरात हिंदू मुस्लिम बांधव मिळून मुकुंद नगर मधील मंदिराचा करणार जीर्णोद्धार – आमदार संग्राम जगताप यांचा प्रेरणादायी निर्णय

अहमदनगर दि.१६ फेब्रुवारी

अहमदनगर शहरातील मुकुंदनगर भागातील मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचं काम लवकरच सुरू होणार असून त्यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी मुकुंद नगर भागातील मंदिरात जाऊन पाहणी केली. यावेळी माजी नगरसेवक निखिल वारे, फारुख शेख अभिजित खोसे, समीर खान यांच्यासह मुकुंद नगर मधील नागरिक उपस्थित होते.

मुकुंदनगर हा भाग मुस्लिम बहुल वस्तीचा असला तरी या ठिकाणी खूप वर्षांपूर्वीची गणपती,विठ्ठल आणि महादेवाची तीन जुनी मंदिरं आहेत मात्र या मंदिरांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे या ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले असल्याने आमदार संग्राम जगताप यांनी आज या ठिकाणी जाऊन पाहणी केली तसेच याठिकाणी ड्रेनेज लाईनचे काम सुरु करण्याचे तातडीचे आदेश दिले असून मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी या भागातील नगरसेवक समद खान आणि फारुक शेख यांच्यासह मुकुंु नगर मधील मुस्लिम बांधवां बरोबर समन्वय साधून हिंदू मुस्लिम बांधवांची मंदिर सेवा समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ही समिती स्थापन झाल्यानंतर या मंदिरांचे जीर्णोद्धाराचे काम सुरु करणार असल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली.

विशेष म्हणजे सध्या संपूर्ण भारतामध्ये जातीय वादी विष काही समाजकंटक पेरत आहेत त्यामुळे हिंदू-मुस्लीम समाजामध्ये तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक काही समाजकंटक करत असताना नगर शहरात हिंदू मुस्लीम बांधव एकत्र येऊन मंदिराचा जीर्णोद्धार करणार असल्याचं हे उदाहरण निश्चितच समाजाला एक प्रेरणादायी ठरणार आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version