Home राजकारण ‘२८ वर्ष विश्वासाचे जनसेवेचे’ असे ब्रीदवाक्य घेत जनसेवा पॅनलची प्रचारात आघाडी, अहमदनगर...

‘२८ वर्ष विश्वासाचे जनसेवेचे’ असे ब्रीदवाक्य घेत जनसेवा पॅनलची प्रचारात आघाडी, अहमदनगर महानगरपालिका कर्मचारी सहकारी पतसंस्था निवडणुकीत आली रंगत!

अहमदनगर प्रतिनिधी
अहमदनगर महानगरपालिका कर्मचारी सहकारी पतसंस्था निवडणूकीचे वारे जोरदार वाहत असून जनसेवा पॅनल विरुद्ध सहकार पॅनल अशी सरळ लढत होण्याची चिन्हे आहेत. कैलास भोसले प्रणित जनसेवा पॅनलने या निवडणुकीमध्ये आघाडी घेत मतदारांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत गेल्या २८ वर्षापासून विश्वासाचे जे नाते सभासदांबरोबर केलेले आहे त्या विश्वासाच्या जोरावरच ही निवडणूक लढवत असल्याचं कैलास भोसले यांनी सांगितल आहे.

बुधवारी अहमदनगर शहराचे ग्रामदैवत विशाल गणपती येथे दर्शन घेऊन प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. या जनसेवा पॅनल मध्ये सर्वसाधारण गटामधून कैलास भोसले, प्रकाश आजबे ,राजेंद्र शिरसाठ, गणेश लयचेट्टी, अशोक कराळे, प्रशांत चांदणे, ऋषिकेश लखापती, नरेंद्र पेवाल,बाळू विधाते, महादेव कोतकर, महिला राखीव गटामधून नंदा भिंगारदिवे, भिमाबाई काळे अनुसूचित जाती जमाती गटामधून प्रसाद उमाप इतर मागास प्रवर्ग मधून राहुल साबळे भटक्या विमुक्त जाती जमाती गटामधून बाबासाहेब राशिनकर हे उमेदवारी करत असून सभासदांचा विश्वास आणि सभासदांसाठी अहमदनगर पतसंस्थेच्या माध्यमातून केलेली कामे हीच आपल्या विजयाची पावती असेल असं प्रतिपादन जनसेवा पॅनलचे अशोक कैलास भोसले यांनी केला आहे. 18 डिसेंबर रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी दुपारून मतमोजणी होऊन नवीन वर्षात नवीन कारभारी या पतसंस्थेला मिळणार आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version