अहिल्यानगर- राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत या परिसरात उभारण्यात आलेल्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचे उत्कृष्ट काम केल्याबद्दल येथील अभियंता रोहन मांडे यांचा कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

ध्रुवतारा कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून इंजिनियर रोहन मांडे यांनी डॉ. आंबेडकर भवनाची उभारणी केली आहे. राहुरी कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या प्रांगणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन बांधण्याचे काम ध्रुवतारा कन्स्ट्रक्शन संस्थेला देण्यात आले होते. सुमारे तीन हजार शेतकरी व प्रेक्षकांसाठी हे सभागृह उपलब्ध करण्यात आले आहे. राहुरी कृषी विद्यापीठ अंतर्गत वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात येत असतात. या कार्यक्रमासाठी हे सभागृह उपयोगी पडणार आहे. ध्रुवतारा कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून दर्जेदार व कमी वेळेत काम पूर्ण केल्याबद्दल रोहन मांडे यांचा सत्कार करण्यात आला. राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे कृषी शिवार फेरी कार्यक्रमाच्या निमित्ताने राहुरी कृषी विद्यापीठात बुधवारी (18 फेब्रुवारी) आले होते. यानिमित्त झालेल्या कार्यक्रमात त्यांच्या हस्ते मांडे यांचा सन्मान करण्यात आला. मांडे यांच्या ध्रुवतारा कन्स्ट्रक्शन संस्थेने जिल्ह्यातील अनेक शासकीय कामे उत्कृष्ट पद्धतीने व कमी वेळेत पूर्ण केली आहेत. यातील अनेक कामांच्या संदर्भात यापूर्वीही त्यांचा गौरव करण्यात आला आहे.
—
समवेत रोहन मांडे सत्कार फ़ोटो





