Homeसांस्कृतिकअपने अपने राम...रामकथेला रेकॉर्ड ब्रेक गर्दी...कुमार विश्वास यांच्या मधुर वाणीतून राम कथेस...

अपने अपने राम…रामकथेला रेकॉर्ड ब्रेक गर्दी…कुमार विश्वास यांच्या मधुर वाणीतून राम कथेस सुरुवात…

advertisement

अहिल्यानगर दिनांक 20 एप्रिल

डॉ. कुमार विश्वास यांच्या ‘अपने अपने राम’ या विशेष रामकथेचे आयोजन अहिल्यानगर मध्ये १९ ते २१ एप्रिल २०२६ या कालावधीत करण्यात आले आहे. ही संगीतमय रामकथा माजी आमदार स्व. अरुणकाका जगताप यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त आयोजित करण्यात आली आहे.
राष्ट्रीय पाठशाळा मैदानावर उभारलेल्या भव्य दिव्य मंडपात या राम कथेचे आयोजन काका ट्रस्ट यांच्या वतीने करण्यात आले आहे. दररोज सायंकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत कथा डॉ.कुमार विश्वास यांच्या मधुर वाणीतून नगरकरांना ऐकण्याची संधी मिळणार आहे.

Oplus_0

या कथेसाठी १ लाख स्क्वेअर फुटाचा भव्य जर्मन हँगर मंडप आणि श्रीराम मंदिराचा आकर्षक सेट उभारण्यात आला आहे.कार्यक्रमाचा प्रारंभ माजी खा. सुजय विखे पाटील.आमदार सत्यजित तांबे,पद्मश्री पोपटराव पवार,मनपा आयुक्त यशवंत डांगे, उपमहापौर धनंजय जाधव,माजी आमदार चंद्रशेखर घुले,आयोजक नगरसेवक विकी शेठ जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.तर श्रीमती पार्वतीताई जगताप,माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप,आमदार संग्राम जगताप,आणि जगतापा कुटुंबियांच्या वतीने डॉ. कुमार विश्वास यांचा सन्मान करण्यात आला.

श्रीराम कथा भारतीयांच्या मनामनात आणि प्रत्येकाच्या ह्रदयात आहे. प्रत्यक्षात प्रत्येक भारतीयांच्या ‘डीएनए’ मध्ये रामकथा सामावलेली आहे. विविध ठिकाणी साधू संत ही कथा असंख्य लोकांपर्यंत पोहोचवित आहेत. कलियुगाच्या वृक्षावर बसलेल्या संशयरूपी पक्षाला दूर करणारी ही कथा असून आजच्या काळात श्रीराम कथेची संजीवनी युवकांपर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन प्रख्यात कवी डॉ. कुमार विश्वास यांनी केले. तर धर्म आणि अध्यात्माची चेतना ही सांसारिक कार्य झालेल्या व्यक्तींसाठी असते, हा समज आहे. भागवत, गीता हे ग्रंथ आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आहेत. मात्र, आपण ते किती वेळा वाचतो, हे महत्वाचे आहे. आपण आपले बँक खाते आणि त्यातील बॅलन्स किती वेळा पाहतो आणि हे ग्रंथ किती वेळा वाचतो, याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. महर्षी वाल्मिकी यांनी ही कथा आपल्याला ऐकविली. ते आद्य कवी होते.
त्यानंतर गीतेला देखील कवितेच्या रूपात सांगण्यात आले. कवी हा द्रष्टा असतो, त्याला पुढचे पाहण्याची शक्ती असते. रामकथा ही मधुर, सोपी आणि तितकीच मनोहारी आहे. त्यामुळे या कथेचे विविध प्रकारे वाचन व श्रवण करून यातून अनेक गोष्टी आपण शिकायला हव्या, असेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याविषयी अनेक गोष्टी देखील सांगितल्या.

श्रीराम कथा आणि वर्तमानात प्रभू श्रीरामांच्या जीवनातील मूल्यांचे महत्व अत्यंत सोप्या शब्दात मांडत तरुणाईला धर्माशी जोडण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला रामनामाचा जयघोष करण्यात आला.

या कार्यक्रमाला पहिल्याच दिवशी नगरकरांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून हजारो भाविक राम कथा ऐकण्यासाठी उपस्थित होते.तर कार्यक्रम संपल्या नंतर तिन्ही दिवस भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था काका ट्रस्टच्या वतीने करण्यात आली आहे.

‘अपने अपने राम’ कथेची वैशिष्ट्ये:
डॉ. कुमार विश्वास आपल्या अमोघ वाणीतून प्रभू श्रीरामांच्या जीवनातील आदर्श, मर्यादा आणि आधुनिक काळातील रामकथेची प्रासंगिकता मांडतात. ते तरुणांना ‘वामपंथ’ कडून ‘रामपथा’कडे येण्याचे आवाहन या कथेच्या माध्यमातून करत असतात. त्यांच्या या कार्यक्रमात रामकथा, कविता आणि संगीत यांचा सुरेख संगम पाहायला मिळतो.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular