अहिल्यानगर
काम बंद याआंदोलनाचा ७ वा — ठेकेदारांचे आंदोलन सुरूच, प्रशासनाकडून अजूनही दखल नाही
विविध प्रलंबित मागण्या तसेच मागील देयके तात्काळ मिळावीत या प्रमुख मागण्यांसाठी सुरू असलेले इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र अहिल्यानगरच्या ठेकेदारांचे आंदोलन आज सातव्या दिवशीही तीव्रतेने सुरू आहे. राज्यभरातील HT, LT, DTC तसेच इतर सर्व कामे पूर्णपणे बंद ठेवून आंदोलन करण्यात येत आहे.

सात दिवस उलटूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस भूमिका घेण्यात आलेली नाही. मागील देयके मोठ्या प्रमाणात प्रलंबित असल्यामुळे ठेकेदारांवर आर्थिक संकट निर्माण झाले असून कामे सुरळीत चालवणे कठीण झाले आहे. अनेक वेळा निवेदने व चर्चा करूनही प्रशासनाकडून फक्त आश्वासने दिली जात असून प्रत्यक्ष निर्णय घेतला जात नाही, याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
Round Robin प्रक्रिया, MO-PO प्रणाली, बिलिंग व पेमेंट सायकल याबाबत स्पष्ट धोरण जाहीर करावे तसेच प्रलंबित देयके तात्काळ अदा करावीत, ही आंदोलनाची प्रमुख मागणी आहे.
प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा येणाऱ्या काळात आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांच्या वतीने देण्यात आला आहे.
इलेक्ट्रिकल contractor असोसिएशन ऑफ महाराष्ट्र अहिल्यानगर विभाग





