Home क्राईम पारनेर पोलिस ठाण्याला पोलिस निरीक्षक दर्जाचा अधिकारी मिळणार का ? कथित ऑडिओ...

पारनेर पोलिस ठाण्याला पोलिस निरीक्षक दर्जाचा अधिकारी मिळणार का ? कथित ऑडिओ संभाषणा नंतर आता थेट पोलिस ठाण्यात डांबून मारहाणीची तक्रार… तक्रारदाराला दहा हजार रुपयांची मागणी ?

3

अहिल्यानार
पारनेर पोलिस स्टेशन अहिल्यानगर जिल्ह्यात महत्वाचे पोलिस ठाणे म्हणून परिचित आहे.पारनेर तालुक्याच्या शेजारून वाहणारी मुळा नदी आणि त्यातून होणारा वाळू उपसा,दुसरीकडे पुणे जिल्ह्याची हद्द,त्यामुळे या पोलिस ठाण्याला मोठे महत्त्व आहे.सध्या या पोलिस ठाण्याचा कारभार सहायक पोलिस निरीक्षक दर्जाचा अधिकाऱ्याकडे सोपवण्यात आला आहे. पारनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांनी वाळू चोरीच्या प्रकरणात फिर्यादीतून नाव वगळण्यासाठी पैसे मागितल्याचा आरोप असलेली कथित ध्वनिफीत समाजमाध्यमांवर प्रसारित झाली त्या नंतर या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी खेडकर यांची नियंत्रण कक्षात बदली केली असून पोलीस उपअधीक्षक (अहिल्यानगर ग्रामीण) यांच्यामार्फत चौकशी सुरू केली आहे.तर त्यांच्या जागी सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांच्याकडे पारनेर पोलीस ठाण्याचा पदभार देण्यात आला आहे.

सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे हे नियंत्रण कक्षात येण्यापूर्वी सुपा पोलिस ठाण्यात कर्तव्यावर असताना 24 जुलै 2025 मध्ये सुपा पोलीस ठाण्यात झालेल्या तरुणाच्या मृत्यू प्रकरणी निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत सुपा त्यांची बदली नियंत्रण कक्षात करण्यात आली होती.या प्रकरणात पोलीस विभागामार्फतही या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र अंतर्गत चौकशी सुरू आहे.

पारनेर पोलीस ठाणे महत्वाचे ठाणे असतानाही या पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाचा अधिकारी देण्यात आला आहे याबाबत आता पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील खासदार निलेश लंके आमदार काशिनाथ दाते यांनी लक्ष घालणे गरजेचे आहे. सहायक पोलीस निरीक्षक दिवटे यांनी पदभार घेतला असतानाही पोलीस ठाणे चा कारभार कशा पद्धतीने सुरू आहे याचे मूर्तीमंत उदाहरण आज पुन्हा पारनेर मध्ये समोर आले आहे. संदीप ज्ञानेश्वर औटी यांना पारनेर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक हंडाळ यांनी पारनेर पोलिस ठाण्यात बेकायदेशीररीत्या डांबून ठेवून मारहाण केल्याचा, तसेच दाखल केलेली तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकल्याचा गंभीर आरोप करीत पारनेर अधीक्षकांकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे.
पोलिस उपनिरीक्षक हंडाळ यांच्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

या बाबत हकीकत अशी की औटी यांच्या अर्जानुसार, ३ सप्टेंबर रोजी रात्री किरकोळ वादानंतर काही जणांनी दुकानात येऊन त्यांना, त्यांच्या पत्नीला, आईला व १५ वर्षीय मुलाला मारहाण केली. याबाबत तक्रार देण्यासाठी ते पारनेर पोलिस ठाण्यात गेले होते. उपचार घेऊन परतल्यानंतर तक्रार नोंदविण्यास विलंब झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक हंडाळ यांनी त्यांना एका खोलीत डांबून ठेवले. पहाटे मारहाण करण्यात आली असून, त्यात कान, गाल व डोळ्याला दुखापत झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यानंतर दिवसभर तक्रार मागे घेण्यासाठी दबाव व दमदाटी करण्यात आल्याचेही अर्जात नमूद आहे.

तसेच समोरील व्यक्तींकडून तक्रार येणार असून अटक टाळायची असल्यास १० हजार रुपये आणण्यास सांगितल्याचा आरोपही औटी यांनी केला आहे. या प्रकरणी ५ सप्टेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाकडे तक्रार केल्याचे त्यांनी अर्जात नमूद केले आहे. पोलिस उपनिरीक्षक हंडाळ यांच्याविरोधात संबंधित आरोपांची चौकशी करून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी औटी यांनी पोलिस अधीक्षकांकडे केली आहे.

पारनेर पोलीस स्टेशन या आधीच खेडकर यांच्या कथित ऑडिओ नंतर चर्चेत आले होते. आता दहा हजार रुपयांची मागणी तक्रारदाराला मारहाण यामुळे चांगले चर्चेत आले असून या ठिकाणी पोलीस निरीक्षक दर्जाचा खाणक्या अधिकारी नेमण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील खासदार निलेश लंके आणि आमदार काशिनाथ दाते यांनी लक्ष घालणे गरजेचे आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here