Homeशहरअहिल्यानगर जिल्हा शिवसेना कार्यकारणी बरखास्त...उद्योग मंत्री तथा अहिल्यानगरचे संपर्क मंत्री उदयजी सामंत...

अहिल्यानगर जिल्हा शिवसेना कार्यकारणी बरखास्त…उद्योग मंत्री तथा अहिल्यानगरचे संपर्क मंत्री उदयजी सामंत यांची घोषणा.

advertisement

अहिल्यानगर दिनांक 7 मे
शिवसेना पक्षाकडून अहिल्यानगरचे संपर्क मंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदयजी सामंत यांनी आज अहिल्यानगर जिल्ह्याचा दौरा केला.या दौऱ्यात उदय सामंत यांनी संगमनेरचे शिवसेनेचे आमदार अमोलजी खताळ यांच्या कार्यालयास भेट देऊन वाढदिवसानिमित्त त्यांचे अभिष्टचिंतन केले.तसेच शिर्डी येथे कोपरगाव,राहता तालुक्याची आढावा बैठक घेतली.नंतर श्रीरामपूर व नेवासा येथेही मंत्री सामंत यांनी शिवसेनेच्या बैठका घेऊन उपस्थित पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला

Oplus_0

मंत्री उदयजी सामंत यांनी अहिल्यानगर जिल्ह्याची शिवसेना कार्यकारणी बरखास्त केली असून विद्यमान जिल्हाप्रमुखांना प्रभारी म्हणून काम पाहण्याचे आदेश दिले आहेत.येत्या महिनाभरात परिपूर्ण व सक्षम कार्यकारणी पुन्हा निवडली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

या दौऱ्यात आ.अमोल खताळ, मा.खा.सदाशिवराव लोखंडे, मा.आ भाऊसाहेब कांबळे,मा.आ.भाणुदास मुरकुटे,नितीन औताडे,कमलाकर कोते,सागरभैया बेग, युवा सेना संपर्कप्रमुख सिद्धेश अभंगे, श्रीमती सुरेखा गव्हाणे, शुभम वाघ,विमल पुंडे,आदी प्रमुख नेते,पदाधिकारी उपस्थित होते.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular