Homeविशेषइथे वाहतो माणुसकीचा झरा... मनसे हा फक्त पक्ष नाही तर लोकांचा आधार...

इथे वाहतो माणुसकीचा झरा… मनसे हा फक्त पक्ष नाही तर लोकांचा आधार आहे , अपघातग्रस्त नागरिकांना मनसे मुळे मोलाची हेल्पलाईन..

advertisement

अहिल्यानगर दिनांक 10 जून

अनेक वेळा अनेक लोकांना प्रत्यय येतो देव कोणत्या रूपातील हे सांगता येत नाही सध्याच्या काळात माणुसकी हरवत चालली असे बोलले जातात मात्र अनेक जण असे आहेत ते आजही दुसऱ्यांसाठी अहोरात्र झटत राहतात.. असाच प्रकार अहिल्यानगर मधील मनसेचे युवा सेनेचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सुमित वर्मा यांच्या रूपाने बस अपघातात जखमी झालेल्या रुग्णांना जणू देवच भेटला असेच म्हणावा लागेल.
6 जून रोजी धुळे पंढरपूर या बसला अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी येथे अपघात झाला होता या अपघातात 40 जखमींना अहिल्यानगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते तर नऊ जणांना एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रवास करणारे सर्वच प्रवासी हे अत्यंत गरीब कुटुंबातील होते त्यातील जे नऊ जण खाजगी रुग्णाला दाखल करण्यात आले होते ते जळगाव जिल्ह्यातील चोपडा या तालुक्यातील रहिवासी होते बस अपघातात जखमी झालेल्या रुग्णांवर खाजगी रुग्णालयात उपचार झाले मात्र सकाळ उजळल्यानंतर हॉस्पिटल व्यवस्थापनाने जखमींच्या हातात भलेमोठे बिल ठेवले एवढे मोठे बिल भरण्याची ताकद त्या जखमी झालेल्या गरीब कुटुंबांमध्ये नव्हती आखेरचा कुटुंबाने या सर्व घटनेची माहिती जळगांव येथील मनविसे चोपडा तालुका संघटक चेतन पवार यांच्या कानावर घातली चेतन पवार यांनी अहिल्यानगर येथील मनविष्येचे राज्य उपाध्यक्ष सुमित वर्मा यांच्या कानावर ही गोष्ट घालून त्या गरीब कुटुंबाला मदत करावी अशी विनंती केली

Oplus_0

ही माहिती कळताच सुमित वर्मा तात्काळ अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी धावले त्यांच्या सोबत प्रकाश गायकवाड , अमोल भालसिंग , भागवत रोमन , बालाजी गिरी , श्रद्धा खोंडे यांनी तातडीने रुग्णालयात धाव घेऊन त्या कुटुंबाला धीर देत रूग्णालय प्रशासनाला धारेवर धरूले अपघात झाला शासकीय वाहनातून आणि त्याचा खर्च सर्वसामान्यांच्या माथी कशाला ? प्रश्न विचारल्यावर रूग्णालय प्रशासनाची धांदल उडाली याप्रकरणी सुमित वर्मा यांनी एसटी महामंडळाच्या अगार प्रमुख जगताप यांच्याशी तात्काळ संपर्क साधुन सर्व बिल माफ करून एक रूपया ही न देता सर्व अपघातग्रस्त नागरिकांना उपचार पुर्ण करून धुळे – चोपडा आणि जळगाव याठिकाणच्या बस मध्ये बसवून दिले .

आधीच अपघातामुळे आम्ही तणावात होतो त्यातून सावरलो तर रुग्णालय प्रशासनाने ४८००० रुपयांची केलेली मागणी ऐकून घाबरून गेले होतो पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची तात्काळ मिळालेली मदत खुप मोलाची ठरली अशी भावना अपघात ग्रस्त कुटुंबाने जाताना व्यक्त केली.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular