अहिल्यानगर दिनांक 21 मे
अहिल्यानगर शहरातील कोतवाली पोलिसांनी एका गावठी कट्टा बाळगणाऱ्या इसमास गावठी कट्ट्यासह पकडले होते. मात्र अवघ्या चार तासात त्या इसमाची न्यायालयाने सुटका केली आहे. याबाबत हकीगत अशी की पुणे बायपास रोडवर एका बंद पडलेल्या टपरी मधे गावठी बंदूक घेऊन थांबला असल्याची माहिती कोतवाली पोलिसांना मिळाली होती त्यानुसार कोतवाली पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकून एका व्यक्तीस ताब्यात घेतले होते त्यावेळी त्याच्याजवळ एक गावठी पिस्तूल आणि कारतूस जप्त करण्यात आले होते. याप्रकरणी खोतवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून कोतवाली पोलिसांनी त्यास पुढील तपासासाठी न्यायालयासमोर उभे केले. आणि पुढील तपास कामी पोलीस कोठडी मिळावी अशी विनंती पोलिसांनी न्यायालयाला केली होती.

मात्र यावेळी न्यायालयासमोर आरोपीच्या वतीने ॲड सुहास टोणे यांनी आरोपीची बाजू मांडताना आरोपीचा त्या गुन्ह्याची काहीही संबंध नाही तसेच पोलिसांनी हत्यार कायद्यातील तरतुदींचे पालन केलेले या व अनेक मुद्द्यांवर युक्तिवाद केला. वकिलांचा युक्तिवाद ऐकून म न्यायालयाने आरोपी शेख यास पोलिसांनी मागणी केलेली पोलीस कोठडीची मागणी फेटाळून लावली. तसेच आरोपी शेख यास तात्काळ जामिनावर सोडून देण्याचा आदेश केला. आरोपी शेख याच्याकडे गावठी पिस्तूल व जिवंत कारतूस मिळून देखील त्यास तात्काळ जामीन कसा मिळाला हा चर्चेचा विषय ठरला आहे. शेख यांच्या वकिलांचे युक्तीवादामुळेच हे शक्य होऊ शकले. आहे यावर सर्वत्र चर्चा सुरू आहे . या प्रकरणात आरोपी शेख याची तर्फे विधिज्ञ सुहास टोणे यांनी कामकाज पाहिले त्यांना ॲड शिवानी सापिके, ॲड विलास ढोणे, ॲड अमित अडागळे, विजय केदार, अड. ओम गुंड, ॲड अक्षय शिंदे यांनी सहकार्य केले.





